उन्हाच्या तडाख्यामुळे शाळा सकाळच्या सत्रात

ठाणे जिल्हा परिषदेचा महत्त्वपूर्ण निर्णय
Thane school News
ठाण्यात उन्हाच्या तडाख्यामुळे शाळा सकाळच्या सत्रात भरणार आहेत.File Photo
Published on
Updated on

ठाणे : ठाणे जिल्ह्यात उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे शाळांच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या काळात तापमानाच्या वाढीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. या घटकाचा विचार करून ठाणे जिल्हा परिषदेने शाळांच्या वेळेत बदल केला आहे.

मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे निवेदन शिक्षक संघटनांकडून देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय राज्यभरात लवकरच लागू होणार आहे. उन्हाची तीव्रता अजून फार वाढलेली नसली, तरी मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरवावी, अशी मागणी होत आहे. यास्तव उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन मार्चच्या दुसर्‍या आठवड्यापासून शाळा सकाळच्या सत्रात भरतील, असे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. शाळेची आधीची वेळ सकाळी 10.20 ते संध्याकाळी 5 अशी होती. ती 15 मार्चपासून सकाळी 7 ते दुपारी 12.30 अशी असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news