Saqib Nachan : पडघा गावातील प्रॉपर्टी डीलर ते मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार

कडवा दहशतवादी साकिब नाचणचा धडकी भरवणारा प्रवास
Saqib Nachan
नाचणच्या मृत्यूनंतर भिवंडीत मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.pudhari photo
Published on
Updated on

ठाणे ः ठाणे जिल्ह्यातील पडघा गावचा रहिवासी असलेला साकिब नाचण हा बंदी घातलेल्या सिमी संघटनेचा कार्यकर्ता होता. त्याने वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर जमीन खरेदी-विक्री व्यवहारांत लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्याच्या कुटुंबाची ठाणे जिल्ह्यात बरीच जमीन आहे. त्याला दोन मुले आणि एक मुलगी आहे. गुजरातमध्ये 1991च्या दहशतवादी हल्लाप्रकरणी त्याला पहिल्यांदा अटक करण्यात आली होती.

सुरुवातीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्याची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने 10 वर्षांपर्यंत कमी केली. 2001 मध्ये तुरुंगातून त्याची सुटका केली गेली. पुढे डिसेंबर 2002 ते मार्च 2003 या काळात मुंबईत तीन बॉम्बस्फोट झाले. यात 12 जणांचा मृत्यू झाला, तर 125 जण जखमी झाले. या तिन्ही बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून साकिबचे नाव पुढे आले होते. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या साथीत स्फोट घडवून आणल्याप्रकरणी तो दोषी आढळला होता.

मुंबई बॉम्बस्फोटात शस्त्रे बाळगल्याबद्दल त्याला दहशतवाद प्रतिबंधक कायद्यानुसार म्हणजेच पोटा कायद्यांतर्गत शिक्षा सुनावण्यात आली होती. या प्रकरणात साकिबची 2017 मध्ये सुटका झाली. यानंतर दहशतवाद्यांना फंडिंग केल्याच्या संशयावरून त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे एनआयएने ताब्यात घेतले होते. इसिससाठी भारतात नेटवर्क तयार केल्याचा आरोप त्याच्यावर होता.

पडघ्याचे बोरीवली गाव ‘अल-शाम’ म्हणजेच इस्लामिक सीरिया?

साकिब नाचण याने पडघ्याला स्वतंत्र क्षेत्र म्हणून घोषित केले होते असा तपास यंत्रणांचा संशय आहे. अल - शाम म्हणजेच एक प्रकारचा इस्लामिक सीरिया. त्याला पडघ्यात निर्माण करायचा होता, असाही संशय आहे. साकिबने पडघा गावाला ‘अल - शाम’ असे नाव दिले होते. पडघ्यातला तळ मजबूत करण्यासाठी ते मुस्लिम तरुणांना पडघ्यात स्थलांतरित करण्यास प्रेरणा देत होता असा दावा एनआयएने केला. देशात विघातक कारवाया करणे, सामाजिक तेढ निर्माण करणे, भारत सरकारविरोधात लढा पुकारणे अशी योजना या मॉड्यूलच्या माध्यमातून होत होती. यापूर्वी पडघा गावातून एनआयएने मागिल वर्षी ऑगस्ट महिन्यात साकिब याच्या मुलाला अटक केली होती.

बोरिवली गावात सुरू होते सीरिया सारखे नेटवर्क

भिवंडी नाशिक हायवेवर बोरिवली गाव हे स्वतंत्र मुस्लिम बहुल राष्ट्र घोषित करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरु असल्याचा धक्कादायक खुलासा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या छाप्यातून समोर आला आहे. या गावाला सीरियासारख्या भूमीत रूपांतरित करण्याची योजना आखण्यात आल्याचं एनआएचं म्हणणं आहे आणि ही देशविघातक कृत्य कुठे सुरु आहे, तर भारताची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या वेशीवर, अवघ्या 50 किमी अंतरावर.

महाराष्ट्र आयसीसच्या दहशतवादी मॉड्यूलवर छाप्यादरम्यान एनआयएनं मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड, बंदुक, धारदार शस्त्रे, गुन्ह्याची कागदपत्रं, स्मार्टफोन आणि इतर डिजिटल उपकरणं जप्त केली आहेत. काही जणांना ताब्यात घेतलं आहे. यातलचं एक मुख्य नाव म्हणजे साकीब नाचन. साकीब स्वत:ला खलिफा म्हणजेच अल्लाहाचा उत्तराधिकारी समजत होता. त्याने पद्धतशीरपणे इसिसशी संबंधित एक-एक गोष्टी गेल्या अनेक वर्षांपासून करायला सुरुवात केली होती.

इसिसच्या महाराष्ट्र मॉड्युलचा म्होरक्या

एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साकिब हा इसिसच्या महाराष्ट्र मॉड्यूलचा म्होरक्या होता. कल्याणमधील पडघा-बोरिवली गावात त्याने त्यासाठी केंद्र उभारले होते आणि तेथूनच तो नव्या मुलांची भरती करत असे. सोबतच या मुलांना तो आर्थिक कायदेशीर मदत करायचा आणि प्रशिक्षणही द्यायचा. तो इसिसमध्ये सामील होणार्‍या लोकांना ‘बैयत’ म्हणजेच इसिसच्या खलिफाशी निष्ठेची शपथही देत असे. साकिब हा बॉम्ब बनवण्यात तज्ज्ञ मानला जात असे.

2003 च्या बॉम्बस्फोटांसाठी त्याने स्वतः बॉम्ब तयार केले होते. एवढेच नव्हे तर 3 ऑगस्ट 2012 रोजी भिवंडीमध्ये विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी मनोज रायचा यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता, त्यातही साकीब आरोपी होता. याशिवाय गोरक्षकांचे वकील ललित जैन यांची 2002 साली हत्या करण्यात आली होती आणि त्या प्रकरणातही साकिब आरोपी होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news