Crime News: मैत्रिणीकडे पाहिल्याच्या संशयावरून प्रवाशाच्या डोक्यात फरशीने प्रहार; हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात

आरोपीचे नाव वकार शेख (वय-23) आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 Crime News
Crime Newspudhari
Published on
Updated on

ठाणे: ठाणे रेल्वे स्थानकात मैत्रिणीकडे पाहिल्याच्या संशयावरून आरोपीने मद्यधुंद प्रवाशावर फरशीने हल्ला केल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. आरोपीचे नाव वकार शेख (वय-23) आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हल्लेखोराने प्रवाशाच्या डोक्यात फरशीने हल्ला केल्याने प्रवाशाच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये सदर प्रकरणाची नोंद करण्यात आली असून रेल्वे पोलिसांनी हल्लखोराला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 Crime News
Pudhari Impact: मुरबाडच्या दीडशे वर्षांच्या ऐतिहासिक वारसाचे जतन होणार

भांडुप येथील प्रसाद (वय-35) हे प्रवासी 29 मार्च रोजी मित्रांना भेटण्यासाठी ठाण्यात आले होते. रात्री उशिरा साधारण 3 वाजण्याच्या सुमारास ते परत जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकावर आले. त्यावेळी त्यांनी मद्यप्राशन केलेले होते. फलाट क्रमांक 4 कडे जात असताना मिडल ब्रिजवर एका अनोळखी तरुणाने आपल्या मैत्रिणीकडे पाहिल्याच्या संशयावरून प्रसाद यांच्याशी वाद घातला. या वादाचे रूपांतर झटापटीत झाले.

संतापलेल्या आरोपीने जवळच पडलेल्या फरशीच्या तुकड्याने प्रसाद यांच्या डोक्याला मारहाण केली. या हल्ल्यात प्रसाद यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. जखमीला तत्काळ उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news