Thane Railway Station Accident | ठाण्यात महानगरी एक्सप्रेसखाली पडल्याने तरुणीचा हात खांद्यापासून तुटला

 Mahanagari Express Accident
Mahanagari Express AccidentPudhari
Published on
Updated on

Mahanagari Express Accident

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकावर सोमवारी (दि. 23) एक धक्कादायक अपघात घडला. प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर आलेल्या महानगरी एक्सप्रेसच्या S-5 आणि S-6 डब्यांखाली एक महिला पाय घसरून पडल्याची माहिती स्टेशन मास्तरांनी अनाऊन्समेंटद्वारे दिली.

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि हमाल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. महिलेला गाडीखालून बाहेर काढण्यात आले असता तिचा उजवा हात खांद्यापासून पूर्णपणे तुटून वेगळा झाल्याचे आढळले. तसेच उजव्या गुडघ्याच्या वरच्या भागातील त्वचा गंभीररीत्या निघाल्यामुळे ती गंभीर जखमी झाली होती. अपघाताच्या वेळी संबंधित महिला शुद्धीवर असल्याचे सांगण्यात आले.

 Mahanagari Express Accident
Thane Crime : नशेच्या विदेशी गोळ्या, 2 किलो हायब्रीड गांजासह एक अटकेत

स्टेशन मास्तरांचा मेमो घेऊन दोन हमालांच्या मदतीने जखमी महिलेला रुग्णवाहिकेद्वारे छत्रपती शिवाजी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. अपघात विभागातील ड्युटीवरील डॉ. दत्ता यांनी तातडीने उपचार सुरू केले.

जखमी महिलेने आपले नाव सीमा शब्बीर शेख (वय २८, रा. शांतिनगर, मोफतलाल उपनगर, सुभीता चाळ, रोटीमंगर, कछवामो) असे सांगितले. तिच्या मोबाईलवरून वडिलांशी संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली व त्यांना तात्काळ रुग्णालयात बोलावण्यात आले.

 Mahanagari Express Accident
Thane Civil Hospital: ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे लोकार्पण रखडले; प्रशासकीय मान्यतेनंतरच उद्घाटन

प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी हात पूर्णपणे तुटल्याने तसेच शल्यचिकित्सक उपलब्ध नसल्यामुळे पुढील उपचारासाठी लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिच्या आई-वडिलांनी स्वतःच्या जबाबदारीवर तिला सायन रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेले.

दरम्यान, जखमी महिलेचा मोबाईल फोन तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून उपचारादरम्यान ती शुद्धीवर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news