

अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान कर्जत दिशेच्या रेल्वे रुळांना तडा गेल्याचे समोर आले आहे. यामुळे अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. या प्रकाराने चाकरमान्यांचे मात्र हाल झाले.
मध्य रेल्वेचा लेट मार्क नवा नाही त्यात रेल्वे मध्ये बिघाड होण्याचे प्रकार देखील समोर येत आहेत. असाच प्रकार मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अंबरनाथमध्ये घडला. कर्जत दिशेने जाणार्या मार्गावर एका ठिकाणी रेल्वे रुळांना तडा गेल्याची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाली.
ऐन गर्दीच्या वेळी सकाळच्या सुमारास स्थानकावर प्रवाशांची कार्यालय गाठण्यासाठी गर्दी होत असतांना रेल्वे खोळंबली होती. त्यामुळे प्रवाशांना संताप व्यक्त केला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून तत्काळ तडे गेलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करत युद्धपातळीवर तडा गेलेले रेल्वे रूळ बदलण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानंतर अर्ध्या तासानंतर रेल्वे सेवा पुर्ववत झाली.