

ठाणे : पंजाब राज्यातील अमृतसर येथे सुवर्ण मंदिराच्या जवळच्या परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेबांच्या पुतळा विटंबनाची घटना सोमवार (दि.27) घडली. याप्रकरणी समस्त रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर निषेध आंदोलन करण्याचा इशारा दिला असून मंगळवारी (दि.28) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने कसाऱ्यात निदर्शने करण्यात आले.
कसारा हे आंबेडकरी चळवळीचा केंद्रबिंदू म्हणून समजले जाते. त्या अनुषंगाने कसारा गावामध्ये मंगळवारी (दि.28) निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ठाणे जिल्हा प्रदेश उपाध्यक्ष तथा (पालघर/ठाणे) सुहास जगताप, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र शेजवळ, कसारा विभाग अध्यक्ष राजू उबाळे, कसारा विभाग सचिव संतोष कर्डक, कसारा विभाग कार्याध्यक्ष राहुल शेजवळ, कसारा शहर अध्यक्ष सद्दाम भोईर, कसारा शहर युवा अध्यक्ष प्रशांत शेजवळ, कसारा युवा विभागीय अध्यक्ष अमित शेजवळ, सरपंच प्रकाश वीर, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत मोरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.