ठाणे : 18,760 कोटींच्या प्रकल्पाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी

Development of Thane : ठाण्यातील अंतर्गत रिंग मेट्रो, ठाणे पालिकेच्या नवीन इमारतीचाही समावेश
PM Modi
पंतप्रधान मोदीPudhari file Photo
Published on
Updated on

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाण्यातील सुमारे 18 हजार 760 कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी होणार असून यामध्ये मुख्य मेट्रोला जोडणार्‍या अंतर्गत रिंग मेट्रो, छेडा नगर ते ठाण्यात आनंदनगर उन्नत पूर्व मुक्त मार्ग, नवी मुंबई विमानतळ तसेच ठाणे महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा समावेश आहे. हे सर्व प्रकल्प मार्गी लागल्यानंतर ठाणे जिल्ह्याच्या विकासाला खर्‍या अर्थाने गती मिळणार आहे. (The development of Thane district will gain momentum.)

ठाणे शहरातील कासारवडवली येथील वालावलकर मैदान येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमप्रसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठाण्यात येणार आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून पंतप्रधानांच्या हस्ते ठाण्यातील विविध प्रकल्पांची पायाभरणी आज होणार आहे. सुमारे 12,200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार्‍या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी 29 किमी असून त्यात 20 उन्नत आणि 2 भूमिगत स्थानके आहेत. हा महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्र असलेल्या ठाण्याच्या वाढत्या वाहतूक गरजा पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. यामुळे ठाणे शहराची वाहतूक व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.

सुमारे 3,310 कोटी रुपये खर्चाच्या छेडा नगर ते आनंद नगर, ठाणे या उन्नत पूर्व मुक्त मार्गाच्या विस्ताराची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई ते ठाण्यापर्यंत महत्वाची कनेक्टिव्हीटी निर्माण होणार आहे. याशिवाय, सुमारे 2,550 कोटी रुपये खर्चाच्या नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाच्या फेज-1 ची पायाभरणी देखील त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये प्रमुख रस्ते, पूल, उड्डाणपूल, अंडरपास आणि एकात्मिक उपयोगिता अशा पायाभूत सुविधांचा समावेश आहे.

ठाण्याच्या विकासाला गती

दुसरीकडे बांधकाम होण्याच्या आधीच वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या आणि सुमारे 700 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार्‍या ठाणे महापालिकेच्या इमारतीची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. ठाणे महानगरपालिकेची 32 मजली उंच प्रशासकीय इमारत प्रस्तावित करण्यात आली असून रेमंड सारख्या मध्यवर्ती ठिकाणी ही इमारत बांधण्यात येणार आहे. अशाप्रकारचे मोठे प्रकल्प मार्गी लागल्यानंतर खर्‍या अर्थाने ठाण्याच्या विकासाला गती मिळणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news