

ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 21 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला. रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी रविवारी (दि.15) रोजी दिली.
भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आल्याने ते आता लवकरच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांच्या जागी मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू नेते रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी रविवारी (दि.15) रोजी दिली. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून रवींद्र चव्हाण हे निवडून आले आहेत. महायुतीच्या आधीच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. 2029 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याचे टार्गेट आहे.