ठाणे : नवरात्र उत्सवासाठी पोलीस दल सज्ज

महिलांसोबत होणारे छेडछाडीचे गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष पथक
Maharashtra Police personnel
महाराष्ट्र पोलिस दल Pudhari
Published on
Updated on

ठाणे : नवरात्रउत्सवासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरात हा उत्सव शांततेत साजरा व्हावा, उत्सवाला गालबोट लागू नये, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशाने पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. साडे तीन हजार पोलीस कर्मचारी, तसेच होमगार्ड, स्वयंसेवक, पोलीस मित्र संघटनेचे कार्यकर्ते अशी ही एकत्रित यंत्रणा कार्यरत झाली आहे.

पोलीस परिमंडळात तयारी पूर्ण

ठाणे आयुक्तालयातील पाचही परिमंडळात पोलिसांची तयारी पूर्ण झाली आहे. या उत्सवासाठी चार अपर पोलीस आयुक्त, ९ पोलीस उपायुक्त, १५ सहाय्यक पोलीस आयुक्त, ९१ पोलीस निरीक्षक, २८३ सहाय्यक / उपपोलीस निरीक्षक, २९ महिला सहाय्यक / पोलीस उपनिरीक्षक, २ हजार ५५२ पोलीस, ५४७ महिला पोलीस, एसआरपीएफच्या ३ तुकड्या, क्यूआरटी प्लॅटून ३ असा पोलीस बंदोबस्तात तैनात असतील अशी माहिती पोलीस आयुक्तालयातून देण्यात आली आहे.

Maharashtra Police personnel
कल्याणात मुलीची छेड काढणाऱ्या रोडरोमियोला अटक

गुरुवार (दि.3) रोजीपासून नवरात्रोत्सव सुरू होत असून त्यानिमित्त सर्वत्र मोठ्या उल्हासाचे वातावरण आहे. धुमधडाक्यात साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सवानिमित्त अनेक ठिकाणी गरबा, दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत एकूण ६०९ सार्वजनिक ठिकाणी देवी मातेच्या मूर्तीची स्थापना होणार असून ३ हजार २७८ इतक्या ठिकाणी खाजगी मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच १४१ सार्वजनिक मंडळातर्फे तर २६० खाजगी देवीच्या प्रतिमेची स्थापना करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे पोलीस आयुक्तालयात ५७२ ठिकाणी सार्वजनिक तर ५०३ ठिकाणी खाजगी गरबा व दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच तीन ठिकाणी रामलीलाचे आयोजन करण्यात आले असून ११ ठिकाणी रावणदहन करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत स्थापन होणाऱ्या मूर्ती

  • सार्वजनिक मंडळ - ६०९, खाजगी ३२७८ • पोलीस आयुक्तालय हद्दीत स्थापन होणारे फोटो, प्रतिमा

  • सार्वजनिक मंडळ - १४१, खाजगी २६० • पोलीस आयुक्तालयात हद्दीत

  • आयोजित होणारे गरबा/दांडिया सार्वजनिक मंडळ - ५७२, खाजगी ५०३ रामलीला ३, रावण दहन - ११

महिलांच्या सुरक्षेसाठी पथक

नवरात्र उत्सवात टवाळखोर मनोवृत्तीच्या काही लोकांकडून तरुणी आणि महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडतात. तसेच या काळात सोनसाखळी खेचण्याचे देखील प्रकार वाढतात, या साऱ्या गुन्ह्यांना आळा बसावा म्हणून ठाणे पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. नवरात्र उत्सवात तरुणीं व महिलांसोबत होणारे छेडछाडीचे गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष पथकाची नियुक्त असतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news