Thane | बॉयलरचा पट्टा तुटल्याने पाईप अंगावर पडून दोघांचा मृत्यू

भिवंडी एमआयडीसी; बॉयलर अंगावर पडल्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू
एमआयडीसी
भिवंडीत क्रेनवरील लोखंडी बॉयलर अंगावर पडल्याने दोन कामगारांचा मृत्यूpudhari news network

भिवंडी : भिवंडी कल्याण रस्त्यावरील तालुक्यातील सरवली एमआयडीसी या ठिकाणी बुधवारी (दि.१०) रोजी एक भला मोठा पाईप हायड्रा क्रेनच्या सहाय्याने उचलत असताना हायड्रा क्रेनचा पट्टा तुटल्याने पाईप अंगावर पडून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Summary

भिवंडी येथील डाइंग कंपनीतील लोखंडी बॉयलर क्रेनच्या सहाय्याने उचलत असताना अचानक क्रेनचा पट्टा तुटल्याने बॉयलर अंगावर पडून दोघा कामगारांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सरवली एमआयडीसी येथे घडली आहे.

एमआयडीसी
भिवंडी येथील डाइंग कंपनीpudhari news network

बाळाराम चौधरी (वय 55) व पांडुरंग आबा पाटील (वय 65) अशी या मयत कामगारांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडी कल्याण रस्त्यावरील सरवली एमआयडीसी येथील प्लॉट 9 ए या ठिकाणी 14 फूट लांबीचा वजनदार वॉटर प्री हिटर बसविण्याचे काम सुरू होते. त्यासाठी भाड्याने बाहेरून हायड्रा क्रेन मागविण्यात आली होती. पाईप हायड्रा क्रेनवरील पट्ट्याच्या सहाय्याने उचलून फिटींगसाठी घेऊन जात असताना अचानक पट्टा तुटल्याने पाईपच्या खाली उभे असलेले क्रेनवरील कामगार यांच्या अंगावर पाईप पडल्याने त्या दुर्घटनमध्ये दोन कामगारांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

एमआयडीसी
भिवंडी येथील डाइंग कंपनीpudhari news network

या दुर्घटनेनंतर कंपनी चालकाने कंपनी बंद केली असून दोन्ही मृतदेह आयजीएम रुग्णालयात शव विच्छेदनासाठी रवाना करण्यात आले आहेत. तर स्थानिक कोनगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या घटनेची नोंद घेण्यासाठी सुरुवात केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news