ठाणे : दिव्यांगांना एसटीत कायमस्वरूपी आरक्षण

साध्या बसेसपासून शिवनेरी बसेसपर्यंत आसन राखीव ठेवण्याच्या सूचना
st
stfile photo
Published on
Updated on

ठाणे : दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यात आले असून, ते कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचे आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असेल, अशी माहिती एसटी महामंडळाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. एसटीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेसमध्ये दिव्यांगांना आरक्षण आसने निश्चित केलेली आहेत.

बस प्रवास  प्रकार
बस प्रवास प्रकारpudhari news network

साध्या बसेसपासून शिवनेरी बसेसपर्यंत दिव्यांग प्रवाशांना प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचे आरक्षित आसन केवळ त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याचे सूचना एसटी महामंडळाने स्थानिक एसटी प्रशासनाला दिलेल्या आहेत. ज्यावेळी बसमध्ये दिव्यांग प्रवासी प्रवास करत नसतील तेव्हा ते आसन सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध होईल. तथापि, दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यावर त्यांना ते आसन तातडीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबधित वाहकाची असेल.

याबरोबरच दिव्यांगांना प्रवास करताना कोणती अडचण येऊ नये म्हणून त्यांना चढ-उतार करताना प्राधान्य द्यावे, तसेच त्यांचा थांबा आल्यानंतर त्यांना अवगत करून बसमधून उतरण्यासाठी चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी, असे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news