Thane | दूधवाढीसाठी म्हशींना 'ऑक्सिटोसिन' इंजेक्शन

भिवंडीत बनावट औषध कारखान्यावर पोलिसांची धाड; दोन जणांना अटक
Thane | 'Oxytocin' injection to buffaloes for milk increase
दूधवाढीसाठी म्हशींना 'ऑक्सिटोसिन' इंजेक्शनPudhari News network
Published on
Updated on

भिवंडी : तबेल्यातील म्हशींच्या कासरा मधून जास्त दूध मिळावे यासाठी दिल्या जाणार्‍या औषध इंजेक्शनची बनावट निर्मिती करणार्‍या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकून केलेल्या कारवाईत तब्बल साडेसात लाख रुपयांचा मध्यमात जप्त करीत दोघा आरोपींना अटक केली आहे तर एक जण फरार आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुभत्या म्हशींना अधिक दुधासाठी ऑक्सिटोसिन या औषधाचा वापर केला जातो. परंतु शहरातील शांतीनगर परिसरातील किडवाई नगर टीचर कॉलनी जवळ जुबेर शेठचा गाळा या ठिकाणी बनावट औषध इंजेक्शनची निर्मिती केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता शांतीनगर पोलिसांनी या ठिकाणी छापा मारून कारवाई केली असता त्याठिकाणी सैफूल माजीद सनफूई,वय 27 वर्षे,अशिक लियाकत सरदार, वय.24 वर्षे दोघे मूळ रा.पश्चिम बंगाल यांनी आपापसात संगनमताने विनापरवाना ऑक्सीटोसीन या औषधाचे अवैधपणे व कोणताही औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्याद्वारे परवाना नसताना निर्माती, साठवणूक, विक्री व वितरण करीत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी या ठिकाणहुन 7 लाख 50 हजार रुपये किमतीचे रसायन मिश्रण लिक्वीड जप्त करण्यात आला असून दोघा जणांना ताब्यात घेतले तर लियाकत शेठ हा फरार असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत. विशेष म्हणजे पोलिसांनी अटक केलेले दोन्ही आरोपी अशिक्षित असून ही या बनावट औषधांची निर्मिती करून औषध उत्पादक विक्रेते असल्याचे भासवून अवैधपणे ऑक्सीओसीनची विक्री करून समाजाची फसवणूक करीत असतानाच सदर इंजेक्शन प्राण्यांना टोचून त्यांना क्रुरतेची वागणूक देऊन अत्याचार केले जात होते. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक राजेश बनकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागरिकांच्या जीवाशी खेळ

हे औषध दिलेल्या गाई म्हशींचे दूध पाणावण्यसाठी विक्री केले जात असून हे औषध दिलेल्या दुभत्या जनावरांचे मिळणारे दुध हे मानवी आरोग्यास हानीकारक असून त्याचे सेवन केल्याने आरोग्यावर श्रावण कमजोरी, दृष्टीहिनता,पोटाचे विकार, नवजात बाळाची कावीळ, गरोदर स्त्रीस रक्तस्राव व अनैसर्गीक गर्भपात, श्वसनाचे व त्वचेचे विकार असे गंभीर आजार होण्याची शक्यता आहे.सदरचे ऑक्सीटॉसिन हे हार्मोन असून त्याचा वापर प्रसुती सुरूळीत करण्यासाठी होत असून त्याच्या विक्री साठी वैद्यकीय अधिकारी यांच्या कडील प्रिसक्रिप्शन आवश्यक असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news