

ठाणे : महापालिकेच्या माध्यमातून 15 ते 20 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले उड्डाणपूल आधा नागरिकांच्या वापरासाठी सुरक्षित आहेत का? याची चाचपणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. येथील उड्डाणपूल तसेच सॅटीस पश्चिमेकडील जुना उड्डाणपूल, मुंब्रा येथील पश्चिमेकडील जुना उड्डाणपूल अशा तीन महत्वाच्या उड्डाणपुलांसोबत जुन्या प्रकल्पांचे देखील स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. यासाठी आयआयटी या संस्थेची देखील मदत घेतली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण २६ असे पुल आहेत. यामध्ये एएमआरडीए, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम तसेच महापालिकेचे उडूण पूल आहेत. त्यापैकी महापालिकेच्या ८ उड्डाणपूल आहेत. तर कोपरी सॅटिस आणि नवीन ठाणे स्टेशन असे २ उडाणपूल प्रगतीपथावर आहेत. कळवा खाडीवरील ब्रिटीशकालीन उड्डाणपूल काही वर्षांपूर्वीच वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर बाजूलाच बांधण्यात आलेल्या दुसऱ्या उड्डाणपुलाला देखील आता १५ ते २० वर्ष बांधून झाले आहेत, तर या दुसऱ्या उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडी कमी करण्पासाठी तिसऱ्या उड्राणपुलाची देखील निर्मिती करण्यात आली असली तरी दोन्ही जुन्या उडाणपुलावर वाहतूक सुरू ठेवण्यात आली असल्याने हा पूल वाहतुकीसाठी सुरक्षित आहे का? हे आता तपासले जाणार आहे.
कळवा खाडी उड्डाणपूलासोबत मुंब्रा येथील उड्डाणपूलाचे देखील स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. त्याच सोबत ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 2015 वर्षापूर्वी बांधण्यात आलेला सॅटीस पश्चिम उड्डाणपुलाचे देखील स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. यासाठी आयआयटी या नामांकित संस्थेची मदत घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
शहरातली महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या या प्रकल्पांना जवळपास 15 ते 20 वर्ष झाली असल्याने स्लैब, पिलर्स, साऊंड बेरिंग आणि सगळ्यांची तपासणी केली जाणार आहे. आयआयटी मुंबईच्या पथकाने तिन्ही पुलांची पाहणी केली आहे. पुढील आठवडयात स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सुरुवात होणार आहे. दिवसा वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून रात्री युद्धपातळीवर काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कळवा खाडीवरील जुन्या पुलाची निर्मिती 1995, गुंजा पुल 2008 तर सॅटिस पुल 2009 साली बांधण्यात आला आहे. त्यामुळे आता हे प्रकल्प जवळपास 15 ते 20 वर्ष जुने झाले असल्याने धोकादायक झाले आहेत की सुस्थितीत आहेत? त्याचा वापर नागरीकांना होऊ शकतो का? तसेच या पुलांचे आयुष्य अजून किती? याचा सखोल अभ्यास करण्यात येणार आहे.