कल्याण : ज्वेलर्सला सोन्याचे दागिने खरेदी केल्यावर हाँलमार्क दागिने देणे बंधनकारक असताना सोन्याच्या दागिन्यांवर हाँलमार्क मानकंन शिक्का न मारता सोन्याचे दागिने दिले जातात. अशी तक्रार बीआयएसला (Bureau of Indian Standards (BIS)) प्राप्त झाल्याने सोमवारी कल्याण पश्चिमेतील परेश जेल्वर्सच्या दुकानाची बीआय एस टीमने झाडाझडती घेतली असता 1610 ग्रँम वजनाचे सोन्याचे दागिने हाँलमार्क मानकंन न केल्याचे आढळले यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, रिंगा, कडे, आदिचा समावेश होता.
सोन्याच्या दागिन्यावर विक्री करताना दिंनाक, हाँलमार्क शिक्का असणे गरजेचे आहे. यामध्ये दोन ग्रँमवरील सर्व सोन्याच्या दागिनाचा समावेश होता. या बाबत बीआयएसचे आधिकारी अमन सिंह यांनी प्रसिद्धी माध्यामांना प्रतिक्रिया देताना ठाणे जिल्ह्यातील सोन्याच्या तीन दुकानावर कारवाई केली असून हाँलमार्क मानकंन न करिता दागिने विक्री बाबत तक्रार होती. त्यानुसार कारवाई केली असून ग्राहकांनी देखील सोन्याचे दागिने खरेदी करतांना हाँलमार्क मानकंनासह शिक्का असल्याची पडताळणी करणे गरजेचे असल्याचे सांगितले.