ended life
संपवले जीवनFile Photo

ठाणे : डोंबिवलीत नायजेरीयन इसमाने संपवले जीवन

डोंबिवली जवळच्या पलावातील नायजेरीयनची पंधराव्या माळ्यावरून उडी
Published on

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील लोढा पलावा गृह प्रकल्पात असलेल्या ॲड्रीना या नायजेरीयन इसमाने इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरून उडी मारून एका 42 वर्षीय नायजेरीयन इसमाने जीवनप्रवास थांबवल्याची घटना गुरुवारी (दि.24) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. त्यास तातडीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डाॅक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले आहे.

अर्नेस्ट ओबीरथ (42) असे मरण पावलेल्या व्यक्तिचे नाव असून त्याच्या जवळील पारपत्रावर नायजेरीया अनमब्रा असा पत्ता आहे. मानपाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या मृत्युप्रकरणी कोणावरही संशय नसल्याचा पोलीस अभिलेखात उल्लेख करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोढा पलावा गृह प्रकल्पातील ॲड्रीना इमारतीच्या डाऊन टाऊन भागात पंधराव्या मजल्यावर अर्नेस्ट ओबीरथ आणि त्याचा मित्र एकेचुव्हू मडक्वे (40) हे दोघे मित्र काही महिन्यांपासून एकत्र राहत होते. ते नोकरी वा व्यवसाय काय करतात याची माहिती सोसायटीतील रहिवाशांना नव्हती. दोघांचे दैनंदिन येणे-जाणे सोसायटीत सुरू होते. गुरूवारी दि.24) दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास अर्नेस्ट याने राहत्या फ्लॅटच्या पंधराव्या मजल्यावरून खिडकीतून जमिनीच्या दिशेने झेप घेतली.

जमिनीवर काहीतरी पडल्याचा सुरक्षा रक्षकाने आवाज ऐकला. जवळ जाऊन पाहिले असता नायजेरियन इसमाचा मृतदेह आढळून आला. ही माहिती तत्काळ मानपाडा पोलिसांना देण्यात आली. अर्नेस्टला शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दिवा, पलावा, आदी भागांत अगणित नायजेरीयन नागरिक राहत आहेत. सकाळच्या वेळेत मुंबईला जाणाऱ्या लोकलमधून ते प्रवास करतात. मात्र कोण कुठे काम धंदा आणि ते काय व्यवसाय करतो, या बद्दल स्थानिक सरकारी यंत्रणा अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट झाले. अर्नेस्ट ओबीरथ हा देखील काम किंवा धंदे काय करत होता. त्याने टोकाचे पाऊल का उचलले ? याचा चौकस तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ बनसोडे तपास करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Pudhari News
pudhari.news