Thane News | जिल्ह्यात पोषणाअभावी तीन हजार बालके कुपोषणाच्या खाईत?

Thane| एक हजार सातशे स्तनदा, गरोदरचे आरोग्य धोक्यात; 104 अंगणवाड्यांमध्ये अंडी-केळी, अमृत आहार बंद
Malnutrition
कुपोषण मुक्तीसाठी राज्यात साकारतोय 'सुरगाणा पॅटर्न'File Photo
Published on
Updated on
पालघर : निखिल मेस्त्री

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शहरी भागांकडे वर्ग करण्यात आलेल्या 104 अंगणवाड्यांचा अमृत पोषण आहार वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळे सहा वर्षांखालील तब्बल तीन हजारांहून अधिक बालके कुपोषणाच्या खाईत लोटले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर एक हजार सातशे पेक्षा जास्त स्तनदा व गरोदर मातांच्या आरोग्यावर व त्यांच्या बालकांवरही परिणाम होत आहे. (Provision of nutritional food )

एक वर्षापासून अमृत आहार बंद

पूर्वी ग्रामीण भागाच्या पेसा क्षेत्रातील (अनुसूचित जमाती क्षेत्र) बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांतर्गत या अंगणवाड्या होत्या. या अंगणवाड्यातील बालकांना अंडी, केळी असा 16 दिवस आहार दिला जात होता. तर स्तनदा-गरोदर मातांना अमृत आहार योजनेअंतर्गत महिन्यातील 25 दिवस चौरस आहार आदिवासी विकास विभागाच्या निधीतून दिला जायचा. मात्र मार्च 2023 पासून पालघर जिल्ह्यात नागरी बालविकास प्रकल्प नव्याने निर्माण होऊन अंगणवाड्याची नव्याने पुनर्रचना करण्यात आली. नागरी प्रकल्पात 104 अंगणवाड्याचे समायोजन झाले. त्यामुळे या अंगणवाड्या बिगर पेसा क्षेत्रात आल्या. परिणामी त्यांना आदिवासी विभागाचा निधी बंद झाला. म्हणून नागरी प्रकल्पात नव्याने समावेश झालेल्या 104 अंगणवाड्यांच्या पोषण आहाराच्या निधीचा प्रस्ताव रखडला आहे. (Provision of nutritional food)

pudhari
नागरी प्रकल्पांतर्गत लाभ बंद असलेल्या अंगणवाड्या व लाभार्थी (मार्च 2023)pudhari news network

चौरस आहार बंद झाल्याने कुपोषणामध्ये भर

गेल्या वर्षभरापासून निधी रखडल्याने अंगणवाडी अंतर्गत असलेल्या अति तीव्र कुपोषित (सॅम), तीव्र कुपोषित (मॅम) बालकांसह वजन कमी असलेल्या इतर बालकांना अंडी केळी देणे बंद झाला आहे. त्यामुळे या बालकांना पोषणाअभावी कुपोषणाचा विळखा बसणार आहे. तर स्तनदा व गरोदर मातांना चौरस आहार बंद झाल्याने भविष्यात जन्मणार्‍या बालकांवर व जन्मलेल्या बालकांवर कुपोषणचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. परिणामी पालघर जिल्ह्याच्या कुपोषणामध्ये आणखीन भर पडणार आहे. एकीकडे कुपोषण निर्मूलनासाठी व बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी सरकार पोषण आहार (Provision of nutritional food) देत असताना दुसरीकडे याच लाभार्थ्यांचा लाभ काढून घेतला आहे. त्यामुळे हा दुजाभाव असल्याचे आरोप केले जात आहेत. नागरी बाल विकास प्रकल्पाला निधी उपलब्ध होऊन हा आहार पुन्हा सुरू व्हावा यासाठी प्रभारी नागरी प्रकल्प कार्यालयाकडून एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याचे प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे.

आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता

मार्च 2023 च्या आकडेवारीनुसार नागरी प्रकल्पा अंतर्गत येत असलेल्या 104 अंगणवाड्यांमध्ये 1720 स्तनदा व गरोदर माता होत्या तर 3142 बालके होती. या आकडेवारीनुसार चाळीसच्या जवळपास बालके तीव्र कुपोषित (मॅम) होती. हा आकडा 2023 चा आहे. आता वर्ष उलटून गेल्याने या आकडेवारी मध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

प्रति लाभार्थी 45 रुपये निधी

अमृत आहार योजनेअंतर्गत स्तनदा व गरोदर मातांसाठी पोषण आहार म्हणून विविध प्रकारची पोषक तत्वे असलेली कडधान्य भाजीपाला आदींचा समावेश असलेला चौरस आहार अंगणवाड्यांमधून दिला जातो. यासाठी प्रति लाभार्थी 45 रुपये इतका निधी आहे. तर बालकांसाठी पोषण म्हणून अंडी केळी दिली जातात. यासाठी प्रति लाभार्थी सहा रुपयांचा निधी मंजूर आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news