

जव्हार : तुळशीराम चौधरी
एकीकडे देश विकासाच्या दिशेने झेपावत असताना दुसरीकडे आजही पालघर जिल्ह्याच्या दुर्गम भागातील आदिवासी बांधव विकासापासून कोसो दूर असल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे.
जव्हार तालुक्यातील घिवंडा ग्रामपंचायत हद्दीतील काही आदिवासी कुटुंबांना शेती वाडी तसेच घरांकडे जाण्यासाठी नदीपार करत जिवघेणा प्रवास करावा लागत आहे. ट्यूब टायरवर बसून, वापर करून नदी ओलांडावी लागत आहे.
पालघर जिल्ह्यात, जव्हार तालुक्यातील घिवंडा ग्रामपंचायत हद्दीतील काही आदिवासी कुटुंबांची शेती वाडी, व घरे वाघ नदीच्या त्या बाजूने असल्याने, त्या कुटुंबांना आजही कुटुंबासह जीवघेणा प्रवास करावा लागत आहे, तसेच येथील शेतकर्यांना ट्यूब टायरवर बसून, वापर करून नदी ओलांडावी लागत आहे. ह्या जव्हार ते मोखाडा तालुक्याला जोडणार्या घिवंडाजवळील नदीवरील पुलाचे बांधकाम व्हावे, अशी ह्या आदिवासी कुटुंबांची वर्षुनवर्षाची मागणी आहे. मात्र कित्यके वर्ष उलटूनही ह्या नदीवरील पुलाची मागणी पूर्ण होतं नाही, मोठी घटना घडण्याची सरकार वाट बघतय का? असा सवाल येथील आदिवासी कुटुंबांना पडला आहे.
जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत घिवंडा हद्दीतील खोरीपाडा, बोंडारपाडा, शिवेचापाडा, व बोरीचापाडा, तसेच. हातेरी, ह्या आदिवासी गावपाड्यातील एकूण 52 आदिवासी कुटुंबांची ही शेती, वाघ नदीच्या त्या बाजने मोखाडा तालुक्याच्या हद्दीत शेती आहे. मात्र ग्रा. घिवंडा, हातेरी ह्या भागातील शेतकर्यांना शेतीकरिता वाघ नदी ओलांडून धोक्का पत्करून त्या बाजूने जावे लागत आहे. कधीकाळी जास्त पाऊस असल्यामुळे त्या शेतकर्यांना शेतीकरिता खूप अडचणींना सामोरे जावे आहे. वाघ नदीचे पात्र खूप मोठे असल्यामुळे नदी पार करण्याकरिता धोका पत्करून नदीचे पात्र ओलांडावे लागत आहे. नदीत पुराचे पाणी अधिक असले तर त्या शेतकर्यांना त्या बाजूने जाण्याकरिता लाकडाच्या ओंडाक्यावर आधाराने, हाता, पायाने, पोहून जाताना जीव मुठीत घेऊन नदी पार करावी लागत आहे. नदीला पूर अधिक असल्यास शेतकर्यांना ट्यूब टायरवरचा वापर करून, नदी ओलांडावी लागत आहे त्यामुळे वाघ नदीवर पुलाचे बांधकाम करावे अशी त्या भागातील ग्रामस्थांची मागणी आहे. नदीला अधिक पुराचे पाणी असल्यास नदीच्या त्या बाजूला शेती करण्याकरिता नदी पार करतांना, कधीकाळी जीव पण गमवावा लागलेला आहे, अशा खूप दुःखद घटना घडलेल्या आहेत, अशा घटना घडतात म्हणून ग्रामस्थ त्या बाजूने शेती करायला घाबरतात असल्याचे सांगत आहेत.