Thane News | ठाणेकरांची परदेशवारी वाढली

वर्षभरात 1 लाख 60 हजार नागरिकांचे पासपोर्टसाठी अर्ज
परदेशवारी
आधुनिक काळाच्या आमूलाग्र परिवर्तनामुळे आता परदेशवारी करणे म्हणजे एक सर्वसामान्य जीवनाचा भाग झाला आहे.Pudhari News Network
Published on
Updated on

ठाणे : कधी काळी परदेशवारी म्हणजे एखाद्या युद्धावर जाण्यातकेच कठीण होते. मात्र आधुनिक काळाच्या आमूलाग्र परिवर्तनामुळे आता परदेशवारी करणे म्हणजे एक सर्वसामान्य जीवनाचा भाग झाला आहे. व्यवसाय, नोकरी, शिक्षण, पर्यटन अशा विविध कारणांसाठी परदेशात जाणार्‍यांचे प्रमाण वाढू लागले आहे. साहजिकच गेल्या दशकभरात पासपोर्टसाठी अर्ज करणार्‍यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ठाण्यात 2024 वर्षात 1 लाख 60 हजार 869 अर्ज नव्याने पासपोर्ट बनवण्यासाठी करण्यात आले आहेत. त्यापैकी 1 लाख 50 हजार 959 नागरिकांना वर्षभरात पासपोर्ट जारी करण्यात आले आहेत.

परदेशवारी आता फक्त श्रीमंतांचीच मक्तेदारी राहिलेली नाही. आता मध्यमवर्गीय नागरिकही परदेशवारी करू लागलेत. त्यामुळे गेल्या दशकभरात पासपोर्ट मागणीसाठी अर्जांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2014 ते मे 2023 पर्यंत दहा कोटी भारतीय नागरिकांना पासपोर्ट जारी करण्यात आले आहेत. त्यात 2014 मध्ये एकूण 91 लाख 46 हजार 071 भारतीय नागरिकांना पासपोर्ट जारी करण्यात आले. त्यानंतर 2019 पर्यंत या संख्येत दरवर्षी वाढ होत गेली. 2020 व 2021 मध्ये, कोविड काळात जारी केलेल्या पासपोर्टची संख्या घसरून अनुक्रमे 63 लाख व 85 लाख इतकी झाली. मात्र कोविडनंतर 2022 मध्ये पुन्हा ही संख्या 1.29 कोटींहून अधिक झाली. 2014 नंतर 2024 मध्ये सर्वाधिक पासपोर्ट जारी केले. ठाण्यातही पासपोर्टसाठी अर्ज करणार्‍यांची संख्या वाढत आहे. 2024 मध्ये ठाण्यात 1 लाख 60 हजार 869 अर्ज नव्याने पासपोर्टसाठी केले आहेेत. त्यापैकी 1 लाख 50 हजार 959 नागरिकांना वर्षभरात पासपोर्ट जारी केले आहेत.

पासपोर्ट यादीत महाराष्ट्र तिसरा

गेल्या वर्षात भारतात केरळ राज्यातून पासपोर्टसाठी सर्वाधिक अर्ज करण्यात आले असून गोवा दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर आहे. 2024 वर्षात देशभरात सव्वा कोटींहून अधिक अर्ज नव्याने पासपोर्ट बनवण्यासाठी करण्यात आले आहेत. भारतीयांच्या वाढत्या पासपोर्टच्या संख्येची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. जगातील सर्वात शक्तिशाली देशाच्या पासपोर्टच्या यादीत भारत 80 व्या क्रमांकावर आहे. हेनले पासपोर्ट सूचकांक यादीत भारतीय पासपोर्ट 80 व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे भारतीय पासपोर्टधारकांना 62 देशांनी आपल्या देशात विना विजा प्रवेश देण्यास मुभा दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news