Thane News | मुंबई-नाशिक महामार्ग खड्डेमुक्त होण्यासाठी मुख्यमंत्री उतरले रस्त्यावर

अधिकार्‍यांसह केली पाहणी
Bhiwandi Road
महामार्गावरील खड्डे भरण्याचा प्रात्यक्षिक स्वतः उपस्थित राहून पाहणी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. pudhari news network
Published on
Updated on

भिवंडी : मागील दोन महिन्यांपासून या महामार्गावरील प्रवासा यातनामय झालेला असताना मुंबई-नाशिक या अवघ्या अडीच तासाच्या प्रवासाकरिता सात ते आठ तास लागत असल्याची ओरड सर्वांनीच केली. त्यामुळे याची दखल राज्यकर्त्यांना सुद्धा घेणे भाग पडले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतल्यानंतर शुक्रवारी (दि.9) रोजी स्वतः एकनाथ शिंदे यांनी अधिकार्‍यांसोबत या महामार्गाची पाहणी करत रस्त्यावरील खड्डे भरण्याचा प्रात्यक्षिक स्वतः पाहिले.

Summary

मुंबई-नाशिक महामार्ग वरील खड्ड्यांमुळे या मार्गाचे अत्यंत दुर्दशा झाली आहे. दुरवस्था झालेल्या रस्त्यावर त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने त्याचा त्रास सर्वसामान्य वाहनचालक प्रवासी चाकरमानी विद्यार्थी यांना सोसावा लागत आहे.

या पाहणी दौर्‍यात आमदार शांताराम मोरे, शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष पंडित पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग यांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होते.

याप्रसंगी वार्ताहरांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी या महामार्गावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असून अवजड वाहन ही वाहतूक कोंडी होईल अशा वेळेस पार्किंग झोन मध्ये थांबवून वाहतूक सुरळीत झाल्यानंतर रात्रीच्या वेळेस त्यांना रस्त्या देण्याची मुभा देण्याचा निर्णय झाला आहे. कल्याण तलवली फाटा व खडवली नाका या ठिकाणी उड्डाणपूल बनवण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या असल्याचे सांगत या महामार्गावरील खड्डे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून भरले जाणार असल्याने हे खड्डे भरल्या नंतर अवघ्या दोन तासांनी त्या मार्गावरून जाणारी वाहतूक सुरळीत होईल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौर्‍यापूर्वी खड्डे बुजविण्याचे प्रयत्न

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या रस्त्याची पाहणी शुक्रवारी करणार होते. ते पाहणी करण्या साठी येण्याच्या काही तास आधी टोल व्यवस्थापन व प्रशासनाकडून तातडीने खड्ड्यांवर थातुर मातुर मलमपट्टी करण्यास सुरवात केली होती. या वेळी स्थानिक नागरिकांनी प्रशासन टोल व्यवस्थापन व लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news