Thane News | ठाणे मुक्ती दिन उत्साहात

ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात 11 वा ठाणे मुक्ती दिन साजरा
ठाणे
ठाणे जिल्हा तर्फे ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात 'ठाणे मुक्ती दिन' उत्साहात साजरा करण्यात आलाPudhari News Network
Published on
Updated on

ठाणे : सह्याद्री प्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा तर्फे ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात 'ठाणे मुक्ती दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाचे हे 11 वे वर्ष होते.

या कार्यक्रमाला आमदार केळकर यांच्यासह, आमदार निरंजन डावखरे, दुर्गरत्न श्रमिक गोजमगुंडे, इतिहासकार मकरंद जोशी, कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले, उपाधीक्षक भोसले, ठा म पा परिवहन सदस्य विकास पाटील, सह्याद्री प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर, अरिफ बडगुजर, संतोष साळुंखे उपस्थित होते.

कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, चिमाजी अप्पा, बलकवडे, अंजूरकर, नाईक, ढमढेरे यांच्या तसबीरीना पुष्पहार घालून फुले वाहण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव च्या जयघोषाने वातावरण शिवमय झालेले पहावयास मिळाले.

आमदार संजय केळकर यांनी 27 मार्च 1737 रोजी आपले ठाणे पोर्तुगीज्यांच्या जोखडीतून मुक्त झाले, 288 वर्ष पूर्ण झाली. त्याची आठवण म्हणून 'ठाणे मुक्ती दिन' साजरा केला जातो असे सांगून, सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक दुर्गरत्न श्रमिक गोजमगुंडे यांच्याही कामाची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर जिवंत ठेवायचा असेल तर त्यांनी बांधलेल्या गडकिल्यांचे आपण संरक्षण केले पाहिजे, कायम राहतील असे बघितले पाहिजे. माझ्या मार्गदर्शनाखाली 25 संघटनांची एकत्रित नुकतीच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह बैठक झाली त्यात गडकिल्ल्याविषयी, दुर्गसांवर्धनबाबत तर चर्चा झालीच पण महत्वाचे 12 किल्ल्याना जागतिक वारसा मिळावा याकरिता प्रयत्न सुरु असल्याचे आ. केळकर यांनी सांगितले. सह्याद्री प्रतिष्ठान ही सर्वात मोठी संस्था असून त्याचे काम दूरवर सुरु आहे. 30000 च्या वर प्रतिष्ठानचे सभासद आहेत.

आमदार निरंजन डावखरे यांनी जो ईतिहास विसरतो त्याचे भवितव्य निश्चितच अंधारमय असतं असे सांगून शालेय विध्यार्थ्यांना अशा कार्यक्रमात आणून इतिहास सांगितला पाहिजे असे मत व्यक्त केले.

इतिहासकार मकरंद जोशी यांनी ठाणे मुक्ती दिन बाबत माहिती दिली. तर दुर्गरत्न श्रमिक गोजमगुंडे यांनी देखील गडकिल्ल्यासंदर्भात व सह्याद्री प्रतिष्ठान बाबत माहिती देऊन गडावर जीर्ण झालेले पुरातन मंदिराचे जीर्णोद्धार हे सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत सुरु असल्याचे सांगितले. निलेश कोळी यांनी सूत्रसंचालन केले. कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news