मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भरधाव टेम्पो दोन वाहनांना धडक देत रस्ता दुभाजकात उलटला

हालोली पाटील पाडा हद्दीत झाला अपघात ; चालक मद्यधुंद असल्याचे निष्पन्न
मुंबई-अहमदाबाद महामार्ग अपघात
पीकअप टेम्पो आणि इको कारला धडकलेला टेम्पो. pudhari news network
Published on
Updated on

पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मद्यधुंद अवस्थेत असल्याने भरधाव वेगातील टेम्पो चालकाने दोन वाहनांना धडक दिली. पीकअप टेम्पो आणि इको कारला धडक देत टेम्पो अपूर्ण अवस्थेतील पुलाच्या नाल्यात जाऊन स्थिरावला. अपघातात मागच्या बाजूने ठोकर दिलेला पीकअप टेम्पो अनियंत्रित होऊन मुंबई मार्गकिवर जाऊन रस्ता दुभाजकात उलटला होता.

शुक्रवारी (दि.9) रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हालोली गावच्या हद्दीत गुजरात वाहिनीवर आगरी कट्टा हॉटेल समोर अपघात झाला होता. तिहेरी अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. अपघातात ग्रस्त टेम्पोचा चालक आश्चर्यकारक रित्या बचावला आहे. मद्यधुंद अवस्थेतील टेम्पो चालकाला नीट उभे राहता येत नसल्याने उपस्थित वाहनचालक आणि स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. मद्यविक्री करणाऱ्या महामार्गालगतचे ढाबे आणि हॉटेल विरोधात कारवाईची मागणी जोर धरत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news