Thane News | होर्डिंगविरोधात पालिका अ‍ॅक्शन मोडवर

कल्याणातील होर्डिंग दुर्घटनेनंतर तांत्रिक बाबींची चौकशी; पाच वर्षे शासनाचा महसूल बुडवला
Thane kalyan
कल्याण पश्चिम खडकपाडा परिसरातील अनधिकृत होर्डिंगवर सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे यांनी कारवाई केली. pudhari news network
Published on
Updated on
सापाड : योगेश गोडे

कल्याण-डोंबिवलीत सध्या अनधिकृत होर्डिंगचा विषय तापला असून अनधिकृत होर्डिंग विरोधात पालिका प्रशासनाने देखील चांगलीच कंबर कसली आहे. त्यामुळे पालिका हद्दीतील अनधिकृत होर्डिंग लावणार्‍यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. परिणामी येणार्‍या काळात अनधिकृत होर्डिंगसह अधिकृत होर्डिंगच्या तांत्रिक बाबींकडे पालिका प्रशासनाचे चांगलेच लक्ष लागणार आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची परवानगी न घेता शहरातील मुख्य चौक आणि मुख्य मार्गावर अवैधरित्या होर्डिंग लावले आहेत. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून, नियमांचे सर्रास उल्लघंन केले जात आहे. या विरोधात पालिकेने अवैध होर्डिंगविरोधात कारवाई करत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे पालिका हद्दीतील अनधिकृत होर्डिंग आणि अधिकृत होर्डिंग लवण्याबाबदची तांत्रिक बाबीं तपासण्याच्या हालचाली पालिका प्रशासनामार्फत सुरू झाल्या असून अनधिकृत होर्डिंग मालकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेला जोर आला आहे. कल्याण पश्चिम खडकपाडा परिसरातील अनधिकृत होर्डिंगवर सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे यांनी तोडक कारवाई केली.

गेल्या पाच वर्षापासून 402 बाय 40 फुटाचे अनधिकृत होर्डिंग उभारून लाखों रुपये कमवणार्‍या अनधिकृत होर्डिंग मालकाकडून पालिका प्रशासनाचा लाखों रुपयाचा महसूल बुडवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या अनधिकृत होल्डींगवर पालिका प्रशासनाच्या अनधिकृत विभागाकडून कारवाई करण्यात आली. या होर्डिंगसाठी पालिका इस्टेड विभागाकडून 2011 साली परवानगी देण्यात आली होती. मात्र पैसे न भरल्यामुळे या होर्डिंगला तत्कालीन आयुक्तांच्या आदेशाने 2019 साली परवानगी नाकारण्यात आली. होर्डिंगमालकाला परवानगी साठी पैसे भरण्याबाबद् वारंवार समज पत्र देण्यात आले.

मोहिमेत सातत्य ठेवण्याची गरज

2019 नंतर या अनधिकृत होर्डिंग मालकाकडून पालिकेला पैसे न भरल्यामुळे गेली पाच वर्षे शासनाचा लाखों रुपयाचा महसूल बुडवून अनधिकृत होर्डिंगवर पैसे लाटत होता. मात्र सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे यांच्या ही बाब लक्षात येताच या चाळीस बाय चाळीसच्या अवाढव्य होर्डिंगवर कारवाई केली. या होर्डिंगवर कारवाईसाठी सहाय्यक आयुक्तांबरोबर अनाधिक विरोधी पथक दोन क्रेन आणि खाजगी मनुष्यबळाच्या साहाय्याने या अवाढव्य अनधिकृत होर्डिंग वर कारवाई करण्यात आली. त्यामुळे अवैध होर्डिंग लावणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र, पालिकेने या मोहिमेत सातत्य ठेवण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कल्याण पश्चिम क प्रभाग क्षेत्र अंतर्गत असणार्‍या अनधिकृत होर्डिंग, बॅनर, फलकांवर आमची कारवाई नियमित सुरू राहील. अनधिकृत होर्डिंग , बॅनर, फलकांवर कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील.

तुषार सोनवणे, सहाय्यक आयुक्त

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news