Thane News | ठाण्यात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट

बस आणि रिक्षामधील प्रवासी टार्गेट
ठाणे
ठाण्यात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट Pudhari News network
Published on
Updated on

ठाणे : सुरेश साळवे

ठाण्यात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट झालेला आहे. चोरटे रेल्वेमधील प्रवाशांचे मोबाईल गर्दीचा फायदा घेऊन लांबविण्याच्या अनेक घटनांनंतर रेल्वे पोलीस प्रशासनाने कडक कारवाईचा बडगा उगारल्याने आता चोरटयांनी आपला मोर्चा खाजगी, टीएमटी बसेस आणि रिक्षातून प्रवास करणार्‍या प्रवाशांना टार्गेट केल्याचे चित्र आहे.

अशी घटना चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. रिक्षातून प्रवास करणार्‍या फिर्यादी रुपाली नितिन भोये(41) या डॉक्टरचा मोबाईल दुचाकीवरील चोरटयांनी हिसकावून घेत धूम ठोकली. याबाबत चितळसर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंदविला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ठाण्याच्या चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानपाडा येथे राहणार्‍या फिर्यादी रुपाली नितीन भोये(41) रा.वरुण गार्डन फ्लॅट नं 204 बिनं 3 मानपाडा सर्विस रोड, ठाणे ही फिर्यादी महिला रिक्षाने 2 डिसेंबर, 2024 रोजी रिक्षाने वृंदावन सोसायटी येथून रिक्षाने प्रवास करताना रात्री 9 वाजण्याच्या सुमारास त्यांची रिक्षा हि तुळशीधाम सर्कल येथे आल्यानंतर रिक्षाच्या मागून एक्टीव्हा दुचाकीने आलेल्या दुचाकीवरील मागे बसलेल्या इसमाने फिर्यादी महिलेचा 70 हजाराचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल हिसकावून तुळशीधाम रोडने हाईडपार्कचे दिशेने पळून गेले. या प्रकारची नोंद चितळसर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

खाजगी बस, टीएमटी आणि रिक्षा प्रवाशी टार्गेट

रेल्वेत गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबाईल लांबविणार्‍या चोरट्याने सध्या आपला मोर्चा आता खाजगी गर्दीच्या बसेस, गर्दीच्या टीएमटी बसेस आणि रिक्षातून प्रवास करणार्‍या प्रवाशांना टार्गेट केळ्याचे चित्र विविध पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या घटनांवरून स्पष्ट होत आहे. मोबाईल चोरीच्या असंख्य घटना विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या आहेत.

पोलिसांची धडक कारवाई...

मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी धडक कारवाई करीत चोरलेल्या, हिसकावलेल्या आणि हरविलेल्या मोबाईलचा पाठपुरावा व तांत्रीक विश्लेषण करून तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने मागील तीन महिन्याचे कालावधीत हरविलेल्या 5 लाख 88 हजार 500 रुपयांचे 52 मोबाईल गहाळ झालेले मोबाईल शोधून काढण्यात नुकतेच यश आले. सदरचे 52 हे मोबाईल धारकांना परत करण्यात आले.

  • हरविलेल्या मोबाईल प्रकरणी पथकाने 7 लाख 20 हजार रुपये किमतीचे 65 मोबाईल फोन हस्तगत करण्याबाबत यशस्वी कारवाई केली. कळवा पोलिसांच्या या यशाने मोबाईल हरविलेल्या तक्रारदारांना दिलासा मिळाला.

  • 12 नोव्हेंबर रोजी युवती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करते नेहमी प्रमाणे घटनेच्या दिवशी तिने गावदेवीकडे जाण्यासाठी नितीन सिग्नलवरून ठाणे पालिका परिवहन सेवेची बस पकडली. बसमध्ये चढताच तिची सोनसाखळी लांबविण्यात आली. विशेष म्हणजे या बसमध्ये चोरट्यांच्या टोळीने मोठी गर्दी केली होती.

  • 18 नोव्हेंबर, 2024 रोजीची घटना शशिकुमार नायर हे सोमवारी रिक्षाने हिरानंदानी इस्टेट येथून रिक्षाने पार्सिकनगर कळवा येथून प्रवास करताना दुचाकीवरील चोरटयांनी मोबाईल पळविला.

  • 27 नोव्हेंबर रोजी सकाळी माजिवडा येथून ठाण्याकडे टीएमटीच्या प्रवास करणार्‍या इंजिनियर फिर्यादी राहुल शमनावल शर्मा(30) याचा मोबाईल बसमध्ये अज्ञात चोरट्याने लांबविला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news