Thane News | बंदीमुळे माळशेज घाटात पर्यटकांचा शुकशुकाट

पर्यटन व्यवसायाला बसली खीळ, आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ
माळशेज घाट
माळशेज घाटात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी टोकावडे पोलीस ठाण्याच्या वतीने घाटात नाकाबंदी करण्यात आली आहे.pudhari news network

मुरबाड : ठाणे आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असणारा माळशेज घाट म्हणजे मुंबई उपनगरातील पर्यटकांची पर्वणीच म्हणावी लागेल. परंतु पर्यटन स्थळावर झालेल्या अपघातांमुळे तसेच अनेक पर्यटक राज्यातील पर्यटन स्थळावर वाहून गेलेल्या घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनाने यंदा माळशेज घाटात व नाणेघाटात पर्यटकांना सरसकट बंदी केल्याने पर्यटकांमुळे रोजगार उपलब्ध होणार्‍या आदिवासींवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे.

घाटातील धबधबे ओस पडल्याचे चित्र दिसून येत आहे. संपूर्ण माळशेज घाटात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी टोकावडे पोलीस ठाण्याच्या वतीने घाटात नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच टोकावडे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिनकर चकोर यांच्या मार्गदर्शनाखाली माळशेज घाटात पोलीस पेट्रोलिंग करत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात पर्यटन स्थळावर पर्यटकांची गर्दी होत असते.परंतु पर्यटन स्थळावर जाणारे पर्यटक सूचनांचे पालन करीत नसल्याने अनेकांचा बळी गेला आहे. हीच बाब लक्षात घेऊन यंदा ठाणे जिल्हा प्रशासनाने माळशेज घाट व नाणेघाटात पर्यटकांना सरसकट बंदी केली आहे.ठीक ठिकाणी तपासणी नाके उभारून पोलिसांची नजर चुकून जाणार्‍या पर्यटकांवर लक्ष केंद्रित केले आहे.

आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ

इतर ठिकाणंच्या घटनांमुळे माळशेज व नाणेघाटातील स्थानिक आदिवासी बांधवांना पर्यटकांच्या शुकशुकाटामुळे रोजगाराला मुकावे लागत आहे.जिल्हा प्रशासनाची कडक बंदी यामुळे आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आहे तालुक्याच्या आदिवासी भागातील आदिवासी बांधव मक्याची कणसे, भुईमुगाच्या शेंगा, आणि इतर वस्तू विक्रीची छोटी मोठी दुकाने माळशेज घाटात थाटत असतात. परंतु यंदा पर्यटकच येत नसल्याने हा संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला आहे.येथीलआदिवासींना रोजगाराच्या संधी प्राप्त न झाल्याने छोटे-मोठे उद्योगधंदे करून गुजारण करतात. मात्र सध्या पर्यटन बंदीमुळे रोजगाराला मुकावे लागत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news