दिघी-मुंबई कॉरिडॉर
दिघी-मुंबई कॉरिडॉरfile photo

Thane News | दिघी-मुंबई कॉरिडॉरला गती मिळणार

दिघी-मुंबई कॉरिडॉरला गती; विकासकामासाठी 500 कोटींची तरतूद
Published on

ठाणे : दिल्ली-मुंबई कॅरिडॉरसाठी 499 कोटींची तरतूद करण्यात आली असून दिघी पोर्ट ते मुंबई आणि मुंबई ते दिल्ली असा हा कॉरिडॉर आहे. यासाठी 500 कोटींची तरतूद करण्यात आली असून रखडलेल्या दिघी पोर्ट रस्त्यांच्या कामाला यामुळे गती मिळू शकणार आहे. केंद्राचा 499 कोटींचा सहभाग आल्याने राज्याला यात 50 टक्के वाटा द्यावा लागणार आहे. (Dighi-Mumbai corridor)

रायगड हा औद्योगिक जिल्हा असून या जिल्ह्यात दोन औद्योगिक कॉरिडॉर प्रस्तावित आहेत. यामध्ये दिघी मुंबई आणि अलिबाग विरार कॉरिडॉरचा समावेश आहे. (Dighi-Mumbai corridor) या दोन महत्वाकांक्षी कॉरिडॉरमुळे रायगडच्या औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे. हे कॉरिडॉर रायगड जिल्ह्यातील 25 गावांमधून ठाणे जिल्ह्यातील 30 गावांमध्ये तर पालघर जिल्ह्यातील 20 गावांमधून जाणार आहे. यात 25 ठिकाणी औद्योगिक पट्टे जाहीर करण्यात आले आहेत. या दोन्ही औद्योगिक कॉरिडॉरसाठी केंद्र सरकारचे अर्थसंकल्प यात तरतूद करण्यात आल्याने या प्रकल्पाला गती मिळणार आहे. त्याचबरोबर मुंबई मेट्रोसाठी 1087 कोटींची तरतूद करण्यात आल्यामुळे ठाण्याची अडकलेली मेट्रो 4 आणि कल्याण तळोजा मेट्रो 12 आणि ठाणे भिवंडी मेट्रो 5 या रखडलेल्या प्रकल्पाला गती मिळू शकणार आहे. कल्याण तळोजा हा प्रकल्प ठाणे आणि रायगडला जोडणार आहे. तर मीरा रोड येथे गेलेली मेट्रो 9 हिचा विस्तार वसई-विरारपर्यंत होणार आहे. याबरोबरच पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर विकासाचा प्रारंभही याचवर्षी केला जाणार आहे. त्यामुळे ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news