Thane News | अनंत पार्कच्या कारवाईने दिव्यात तणाव वाढणार

दिव्यातील जागामालक आणि रहिवाशांच्या वादामुळे 18 वर्षांनंतर पालिकेचा कारवाईचा फार्स
कोपर (ठाणे) Thane News
दिव्यातील जागामालक आणि रहिवाशांच्या वादामुळे 18 वर्षांनंतर पालिकेचा कारवाईचा फार्स Pudhari News Network
Published on
Updated on

कोपर (ठाणे) : ठाणे महानगर पालिकेच्या दिवा प्रभाग समितीच्या हद्दीत दिवा आगासन रोड येथील अनंत पार्क हौसिंग सोसायटी नावाच्या 3 अनधिकृत इमारतींवर कारवाईबाबत पालिकेवर उच्च न्यायालयाने आगपाखड केली असता पालिका अधिकारी यांनी नोटीस बजावून सोमवारी (17) कारवाईचा इशारा दिल्यानंतर दिव्यात स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष उफाळला. तर नागरिकांनी पालिकेविरोधात दोन हात करण्याची तयारी दर्शविली आहे. यापूर्वी दोनवेळा कारवाई केल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. मात्र आता सोमवारी कारवाई होईल का? याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.

दिवा पूर्वेच्या चौकातील अनंत पार्कवर महापालिकेकडून तब्बल 18 वर्षांनंतर कारवाई होत आहे. अनंत पार्क सोसायटीमधील तिसर्‍या इमारतील रहिवाशी आणि जागा मालक मोहन मढवी यांच्यात वाद सुरु होते. तो वाद न्यायालयात जाऊन अनंत पार्कवर अतिक्रमणावर कारवाईचे आदेश आले. ती कारवाई थांबवण्यासाठी अनंत पार्कमधील रहिवाशी आम्ही जिव देऊ पण आमचे घर तोडायला देणार नाही, या निर्णयावर आलेले आहेत. त्यावेळी नागरिकांचा संताप दिसून आला. तर काही नागरिक रस्त्यावर उतरुन रस्ता जाम केला होता. तसेच तेथे फास लावून घेतलेला प्रतिकात्मक भला मोठा पुतळा इमारतीच्या मधोमध लावण्यात आला आहे. आमच्या बळीला जबाबदार कोण, असा प्रश्न करत पोस्टरबाजी नागरिकांकडून केली जात आहे.

18 वर्षांआधी बांधलेली अनंत पार्क ही सोसायटी 3 इमारतींची आहे. तर मोहन मढवी यांच्या तिसर्‍या इमारतीमध्ये 14 फ्लॅट सद्या असल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात आले. त्या फ्लॅटचे ते इमारत मेंटेनस आणि पाणीबील भरत नसल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. तिसर्‍या इमारतीतील रहिवाशांचा जागामालकाशी वाद होऊन ते जागेचा सात बारा सोसायटीच्या नावावर करायला गेल्याने तो वाद चिघळला. त्यानंतर जागा मालक मोहन मढवी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत माझ्या जागेत अनधिकृत बांधकाम झाले असून ते तोडण्यात यावे, अशी मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने ती बाब मान्य करुन पालिकेला कारवाईचे आदेश दिले. आता सद्या अनंत पार्क या सोसायटीमधील तिनही इमारतींवर अतिक्रमणाची कारवाईचा फार्स पालिकेकडून आहे. कारण न्यायालयाने ठाणे पालिका आयुक्तांना ही अतिक्रमणाची कारवाई 18 वर्षे का झाली नाही, हे विचारताच पालिकेने तीन आठवड्यांची मुदत घेऊन ती कारवाई करु, असे उच्च न्यायालयाला सांगितले आहे. त्यानंतर या तोडक कारवाईची माहिती घेऊन नागरिकांना सांगायला आलेल्या राजेंद्र गिरी, दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

न्यायालयाचे आदेश असल्याने ही कारवाई करावी लागणार आहे, असे ते म्हणाले. तर दुसरीकडे रहिवाशी जिवाची पर्वा न करता स्वतःचे घर वाचवण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार झाले आहेत. स्वतःचे राहते घर वाचवण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले. तर आमची आयुष्यभराची कमाई आम्ही या घरात घातल्यानंतर आता 18 वर्षांनी घर सोडायला लागल्यास आम्हाला फास लावून घेण्याशिवाय पर्याय नसल्याने फास लावून घेतलेला प्रतिकात्मक भला मोठा पुतळा नागरिकांनी इमारतीच्या मधोमध लावला आहे. आमच्या बळीला जबाबदार कोण, असा प्रश्न करत पोस्टरबाजी केली गेली आहे.

कोपर (ठाणे)
18 वर्षांआधी बांधलेली अनंत पार्क ही सोसायटी 3 इमारतींची आहेPudhari News Network

उच्च न्यायालयाचे अनंत पार्क सोसायटीवर तोडक कारवाईचे कोणतेही आदेश नसताना पालिका 17 वर्ष जुन्या इमारतींवर कारवाई करते व रहिवाशांना इमारत खाली करण्यासाठी धमकावत आहे. अनंत पार्क सोसायटीला पोलिसांकडून संरक्षण मिळावे यासाठी लेखी निवेदन दिले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशविना पालिका कारवाईला आली तर तितक्याच आक्रमक पद्धतीने उत्तर दिले जाईल,याची नोंद पालिकेने घ्यावी.

अ‍ॅड. आदेश भगत, उपशहरप्रमुख शिवसेना, दिवा

अनंत पार्क हौसिंग सोसायटीच्या प्रत्येक घरावर फास लटकावून ठेवीत चोराला संरक्षण आणि संन्याशाला फाशी, अशा प्रकारचे प्रतीक दाखविण्यात आले. थोडक्यात करो या मरो या निर्णायक लढाईला सज्ज झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news