Thane News | मिरारोडमध्ये पाच बांगलादेशी महिलांवर कारवाई

परिसरात अनाधिकृतरित्या वास्तव; अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथकाची कारवाई
बांगलादेशी महिला
पाच बांगलादेशी महिला नागरिकांवर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथकाने कारवाई केली आहे. image source - X
Published on
Updated on

मिरा रोड : मिरारोड व नयानगर पोलीस ठाण्याचे हद्दीत अनाधिकृतरित्या वास्तव करत असलेल्या 5 बांगलादेशी महिला नागरिकांवर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथकाने कारवाई केली आहे.

एव्हरशाईन वुड बिल्डींगच्या पाठीमागील झोपडपट्टी, बेवर्ली पार्करोड, तसेच न्यु मिरा पॅराडाईस बिल्डींगचे पाठीमागील झोपडपट्टी, गितानगर, या ठिकाणी बांगलादेशी नागरीक वास्तव्यास आहेत तसेच जैन मंदीर, अंबर स्विट मार्ट जवळ मिरारोड पुर्व या ठिकाणी कामासाठी बांगलादेशी नागरीक येत असल्याची व ते विनापरवाना राहत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथक, पंच यांच्यासह सापळा रचुन एव्हरशाईन वुड बिल्डींगच्या पाठीमागील झोपडपट्टी, बेवर्ली पार्क या ठिकाणी 2 बांगलादेशी महिला मिळून आल्या. तसेच न्यु मिरा पॅराडाईस बिल्डींगचे पाठीमागील झोपडपट्टी, गितानगर, तसेच जैन मंदीर, अंबर स्विट मार्टजवळ मिरारोड या ठिकाणी 3 बांगलादेशी महिला नागरीक मिळुन आल्या. पाच बांगलादेशी महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्या बांगलादेशी नागरीक असल्याची कबुली दिली. या महिलांना ताब्यात घेवून बांगलादेशी नागरीकांविरुध्द मिरारोड व नयानगर पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news