Thane News | अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

आरोपीला अटक, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
 minor girl Abuse
अल्पवयीन मुलीवर अत्याचारFile Photo
Published on
Updated on

अंबरनाथ : एका ज्येष्ठ नागरिकाने सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना अंबरनाथ शहराच्या पश्चिमेला घडली आहे. मुलीच्या तक्रारी वरून पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून ज्येष्ठ नागरिक आरोपी निसार ठाणगे (७५) याला अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपी हा पिडीत मुलीच्या वडिलांचा मित्रच होता. (The accused was a friend of the victim girl's father)

कोलकाता येथील महिला डॉक्टर वरील बलात्कार व तिची निघृण हत्येच्या निषेधार्थ अंबरनाथ मध्ये कँडल मार्च काढला जात असताना अंबरनाथ शहरातच एका ज्येष्ठ नागरिकांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या नराधम ज्येष्ठ नागरिकाविरोधात पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सध्या या आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलीच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरवले आहे. त्यामुळे आपल्या आईसोबत ही मुलगी राहते.. आरोपी जेष्ठ नागरिक हा पीडित मुलीच्या वडिलांचा मित्र असल्याने त्याचे या कुटुंबाशी पारिवारिक नाते होते. त्यामुळे ही मुलगी घरात एकटी असताना आरोपी जेष्ठ नागरिकाने कामाचा बहाणा करून घरात प्रवेश केला व या मुलीवर बलात्कार केला. एवढेच नाही तर ही बाब आईला सांगितली तर आईची हत्या करेन अशी धमकी दिली. मात्र आईला हा सारा प्रकार सांगितल्यानंतर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी निसार ठाणगे याला अटक केली आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news