Thane News | बोगस बँकखाते उघडून 380 कोटीचा गोलमाल

दिव्यातील तरुणाला नोकरीसाठी बोलावले ; कागदपत्रे घेत बँक खाते उघडून अफरातफर
Thane Bank Fraud News
बोगस बँकखाते उघडून 380 कोटीचा गोलमालFile Photo
Published on
Updated on

ठाणे : नोकरीचे आमिष दाखवून घेतलेल्या कागदपत्रावर बँकेत खाते उघडून कोट्यवधी रुपयाचा व्यवहार करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने या खात्यावरुन 380 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याने खातेधारक प्रमोद गोपाळ पानगल याला चौकशीला बोलावले. मात्र याबाबत त्याला काहीच माहिती नसल्याचे पुढे आले. या प्रकरणी पोलिसांनी दिपक शुक्ला, राहूल पटवा, चेतन खाडे यांच्यावर 380 कोटी रुपयाचा बेकायदेशीर व्यवहार केल्याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

फिर्यादी प्रमोद गोपाळ पानगले (38) रा. ओम साई चाळ रूम नं-09 गणेष नगर, आगासान दिवा, जि. ठाणे दिवा परिसरात ईस्टेट एजंट व्यवसाय करीत होते. फिर्यादीच्या परिचयाचे चेतन खाडे, रा. डोंबिवली याने मोबाईलवर संपर्क साधून महिन्याला 20 हजाराचा पगार मिळेल, असे आमिष दाखविले. खाडे याने मालाड येथे राहणार्‍या राहुल पटवा याच्याशी ओळख करून दिली. दोघांनी फिर्यादीचे आधारकार्ड, पॅनकार्ड, फोटो व माझ्या जुन्या बँक खात्याचा एक सही केलेला बँकेचा चेक सोबत आणायला सांगून काळबादेवी मुंबई येथे बोलावले. तेथे दिपक शुक्ला यांच्याशी भेट करून दिली. दिपक शुक्ला यांच्या कार्यालयात फिर्यादीत यांचे बँक खाते उघडण्यासाठी बँकेचे प्रतिनिधी आले. त्यांनी प्रमोदचे ओळखपत्रे घेऊन फोटो आणि व्हिडिओ बनवला. कोटक बँक खात्यावर पगार येईल, असे सांगून चार दिवसांनी दिपक शुक्ला, चेतन खाडे आणि राहुल पटवा हें मला दिवा येथे भेटण्यास माझ्या घरी आले तेथून त्यांनी फिर्यादीला काळबादेवी मुंबई येथील दिपक शुक्ला यांच्या कार्यालयात घेऊन गेले. त्यावेळी दिपक शुक्ला व राहूल पटवा यांनी मला नोकरीसाठी लागणारे काही कागदपत्रे दाखवली व त्यावर फिर्यादी याची सही घेतली. त्याचवेळी कोटक बँकेच्या 5 चेक्सवर सह्या घेतल्या व नोकरी करीता दहा-बारा दिवसांनी परत यावे लागेल असे सांगून मला घरी जाण्यास सांगितले. कोटक बँकेचे खाते तांत्रिक कारणास्तव रद्द झाले. पुन्हा कागदपत्र आणि सह्या घेऊन ए.यु.फायनान्स बँक ठाणे येथे खाते उघडले.

या दोन्ही बँकेत रजिस्टर नं हा भलताच टाकण्यात आला. तर बँकेचे आलेले मेसेजकडे लक्ष देऊ नका असेही फिर्यादिला सांगितले. दोन्ही बँकेत त्रिकुटाने वेगळे मोबाईल देऊन ओटीपी आणि इतर कामासाठी वापर केला. तर तिघांनी संगनमत करीत दोन्ही बँकेत फिर्यादी यांच्या नावे असलेल्या बँकेत प्रमोद कार्पोरेषन शॉप नं-17, दुसरा मजला, धन भवन, जुने हनुमान फस्ट एक्स लेन, एमजे, मुंबई 400 042 या प्रोप्रायटरशीप फर्मच्या नावे कोटक बैंक येथे बँक खाते उघडण्यात आले. संपर्कासाठी फिर्यादीच्या नावाचा बनावट मेल तयार करून दोन्ही बँकेतून तब्बल 383 कोटी 83 लाख 63 हजाराचा व्यवहार केला.

पानगल यांना कुठल्याच प्रकारची कल्पना नाही?

याबाबत फिर्यादी पानगल यांना कुठल्याच प्रकारची कल्पना नव्हती. तिन्ही आरोपी हे मोबाईल ओटीपी आणि मेलद्वारे बँक व्यवहार परस्पर करीत होते. मोठ्या रकमेची आवक जावक झाल्याने ठाणे शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या विभागाने फिर्यादी प्रमोद पानगल यांना विचारणा केली. त्यांनी नोंदविलेल्या जबाबांमध्ये सदरचे प्रकरण समोर आले. ठाणे शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने जबाब नोंदविल्यानंतर फिर्यादी पानगल यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात आरोपी दिपक शुक्ला, चेतन खाडे आणि राहुल पटवा यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news