

ठाणे : वायफळ बडबड करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानावर सर्वत्र टीकेचे पडसाद उमटत आहेत. आज ठाण्यातही याचे पडसाद उमटले. संतप्त महिला शिवसैनिकांनी गोऱ्हे यांच्या पोस्टरला टायरने चिरडून “बदक नीलम गोऱ्हे हाय हाय,” “टायर काकूंचा निषेध असो” “माफी माग माफी माग, नाक घासून माफी माग” अशी जोरदार घोषणाबाजी करत नीलम गोऱ्हे यांचा निषेध केला.
यावेळी महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, आकांक्षा राणे, ज्योती किरण कोळी, वैशाली शिंदे, वासंती राऊत, प्रमिला भांगे, मंजिरी ढमाले, विद्या कदम, अनिता प्रभू, नीलिमा शिंदे, राजेश्री नवीन सुर्वे, संगीता साळवी, सुनंदा देशपांडे, वनिता कोळी, पुष्पलता भानुशाली, अनुया पांजरी, रेखा पाटील, आरती मोरे, पौर्णिमा लाड, अपर्णा भोईर, वैशाली मोरे, शिला पाटील, सुरेखा खानेकर, रक्षिता सुभेदार, कविता धुमाळ,अमृता पवार, नैना सुर्वे, कांता पाटील, छाया आराममृगम, कविता सिनलकर यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.