Thane Municipal Election: सेना विरुद्ध सेना लढतीने ठाण्यात राजकीय भूकंप; बंडखोरीने उमेदवारांची डोकेदुखी वाढली

ठाणे महापालिकेत शिवसेना-भाजप युतीनंतर इच्छुकांचा संताप; बंडखोर शिवसैनिकांमुळे भाजपसह सेनेचे अधिकृत उमेदवार अडचणीत
Thane Municipal Election
Thane Municipal ElectionPudhari
Published on
Updated on

ठाणे : स्थानिक नेत्यांचा विरोध असतानाही ठाणे महापालिकेत शिवसेना आणि भाजपची युती झाली आणि इच्छुक उमेदवारांच्या नाराजीचा विस्फोट झाला आहे. सर्वाधिक बंडखोरी शिवसेनेत झाल्याने सेना उमेदवारांसह भाजप उमेदवारांची चिंता वाढली आहे.

Thane Municipal Election
Balasaheb Thackeray statue news: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा धाक कायम; कुलाब्यातील पुतळा झाकला

त्यात शिवसेनेचे विभागप्रमुख रवी घरत आणि माजी नगरसेवक भूषण भोईर यांच्या पत्नीला सेनेची उमेदवारी मिळाली असताना बंडखोरी करीत शिवसेना उमेदवार पाडण्याचा विडा उचलला आहे. तसेच दहा माजी नगरसेवक आणि तीन पदाधिकाऱ्यांमुळे सर्वाधिक भाजप उमेदवार अडचणीत आले आहेत.

Thane Municipal Election
Mumbai air quality update: मुंबईत वायू प्रदूषणात किंचित घट, शिवाजीनगर-गोवंडीमध्ये AQI 223

शिवसेनेच्या महिला संघटक मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेच्या भूषण भोईर आणि मधुकर पावशे या माजी नगरसेवकांची विकेट पडली आहे. तो राग मनात धरून भोईर आणि पावशे यांनी अपक्षांचा पॅनल उभा करून शिंदे यांच्यापुढे आव्हान निर्माण केले आहे. तसेच भाजपचे दत्ता घाडगे यांनी बंडखोरी केली आहे. भूषण भोईर यांच्या पत्नीला शिवसेनेने उमेदवारी दिली आहे, तरी देखील त्यांनी बंडखोरी करीत शिंदे विरुद्ध भोईर वादाला अधिक हवा दिली आहे.

Thane Municipal Election
Ratnagiri to Mumbai Tejas Express: रत्नागिरी ते मुंबई 'तेजस एक्सप्रेस'ला 6 तास 45 मिनिटाने विलंब...; प्रवाशांचा संताप

याचप्रकारे प्रभाग एकमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांचे कट्टर विभागप्रमुख रवी घरत यांनी शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत बंडखोरी केली आहे. घरत यांनी खुलेआम उपमुख्यमंत्री शिंदे यांचे कट्टर समर्थक सिद्धार्थ ओवळेकर यांना आव्हान दिल्याने शिंदे आणि सरनाईक गटातील शीतयुद्ध उघड झाले आहे. गंमत म्हणजे, घरत यांच्या पत्नी नम्रता घरत या शिवसेनेच्या उमेदवार म्हणून ओवळेकर यांच्यासोबत निवडणूक लढवीत आहेत. एकाच पॅनलमध्ये अशाप्रकारे पती-पत्नी एकमेकांविरोधात निवडणूक लढवित असल्याचे चित्र आहे.

Thane Municipal Election
Maharashtra Municipal Election: राज्यात 2,869 नगरसेवकपदांसाठी 15,931 उमेदवार रिंगणात

नौपाड्यात भाजपचे उमेदवार सुनेश जोशी यांच्याविरोधात शिवसेनेचे विभागप्रमुख किरण नाकती यांनी बंडखोरी केली आहे. त्याचबरोबर भाजप उमेदवार उषा वाघ यांना सेनेच्या माजी नगरसेविका शांता सोळंकी यांनी बंडखोरी करीत आव्हान दिले आहे. याच प्रभागात सेनेचे उमेदवार पवन कदम यांच्याविरोधात विकास दाभाडे यांनी बंड केले. कळव्यात सेनेच्या अनिता गौरी यांच्याविरोधात माजी नगरसेविका सुरेखा पाटील, सेनेच्या नगरसेविका प्रमिला किणे या सेनेच्याच मनाली पाटील यांच्याविरोधात निवडणुका लढवत आहेत.

Thane Municipal Election
Homi Bhabha University: शालेय विद्यार्थ्यांना हसतखेळत गणिताची ओळख

दोन्ही नगरसेविकांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून शिवसेनेत प्रवेश केला होता. उमेदवारी नाकारल्याने सेनेच्या माजी नगरसेविका मंगल कळंबे आणि सेनेतून भाजपमध्ये दाखल झालेल्या माजी नगरसेविका रागिणी बेरीशेट्टी यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने बंडाळी केली आहे. सेनेच्या एका मंत्र्यांनी त्यांच्या उमेदवारीस प्रखर विरोध केल्याने बेरीशेट्टी यांच्याऐवजी सीताराम राणे यांना उमेदवारी देण्यात आली. सेनेचे माजी नगरसेवक संजय सोनारे यांच्या पत्नीने भाजप उमेदवाराच्या विरोधात अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

Thane Municipal Election
MSBTE Online Photocopy Revaluation: तंत्रशिक्षण मंडळाची फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकन प्रक्रिया ऑनलाईन

शिवसेनेचे माजी महापौर हरिचंद्र पाटील यांचा मुलगा विकी पाटील आणि विभागप्रमुख नितीन लांडगे व त्यांची पत्नी प्रणोती लांडगे यांनी प्रभाग चारमध्ये भाजपचे दोन उमेदवार आणि सेनेच्या एकाउमेदवारविरोधात बंडखोरी केली आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या माजी नगरसेविका निशा पाटील यांची उमेदवारी कापून भूषण भोईर यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने पाटील यांनी बंडखोरी केल्याचे दिसून येते. एकंदरीत ठाण्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना तसेच भाजप विरुद्ध शिवसेना अशी बंडखोरी झाल्याचे दिसून येते. याचा फटका कुणाला बसतो याचे चित्र 16 जानेवारीला स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news