Thane UPSC Success: UPSC निकालात ठाणे महापालिकेच्या संस्थेची चमक; 10 विद्यार्थ्यांनी मिळवले गुणवत्ता यादीत स्थान

कै. चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेच्या प्रशिक्षणाचा ठसा; दिपाली महतो रँक 36 सह अनेक विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
UPSC Result
UPSC Result Pudhari Photo
Published on
Updated on

ठाणे : केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ठाणे महानगरपालिकेच्या कै. चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेत प्रशिक्षण या संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या 10 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर तसेच महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या यशामुळे ठाणे महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असल्याचे महापौरांनी नमूद केले.

UPSC Result
Dombivli Car Burning: डोंबिवलीत पुन्हा आगडोंब; गोकुळधाम सोसायटीत कारला पेट्रोल टाकून जाळले

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दिपाली महतो (रँक 36), अंकिता पाटील (रँक 140), अभिषेक मगदूम (रँक 449), धनंजय दिघे (रँक 529), पारस मेस्त्री (रँक 555), अवष्कािर डेर्ले (रँक 591), सिद्धार्थ तगड (रँक 619), शिवम वखारे (रँक 651), मनीष झेंडे (रँक 788 ), प्रणव बेंढारी (रँक 926) यांनी घवघवीत यश प्राप्त केले. हे 10 विद्यार्थी ठाणे महानगरपालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेत नियमित प्रशिक्षण घेत होते.

UPSC Result
Child Abuse: भिवंडीत सावत्र आईची क्रूरता; ‘मम्मा’ म्हटल्याच्या रागातून 3 वर्षांच्या चिमुरडीच्या डोळ्यात मिरची पूड

ठाणे महापालिका संचलित ही संस्था यूपीएससी व एमपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण देणारी महत्त्वाची संस्था असून येथून अनेक विद्यार्थ्यांनी यापूर्वीही यश मिळवून शासनाच्या विविध सेवांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत.

प्रशासकीय सेवेत महाराष्ट्रातील मराठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. संस्थेत सुमारे 140 विद्यार्थ्यांची बॅच असून विद्यार्थ्यांना दरमहा तीन हजार रुपये स्टायपेंड, वसतिगृहाची सुविधा तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक सर्वांगीण मार्गदर्शन दिले जाते. देशातील महापालिकांमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी असे दर्जेदार प्रशिक्षण देणारी ठाणे महानगरपालिका ही अग्रणी संस्था आहे

UPSC Result
Child Abuse: भिवंडीत सावत्र आईची क्रूरता; ‘मम्मा’ म्हटल्याच्या रागातून 3 वर्षांच्या चिमुरडीच्या डोळ्यात मिरची पूड

प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील मराठी माणसाचा टक्का हा जास्तीजास्त वाढला पाहिजे. त्यासाठी सीडी देशमुख ही संस्था सर्वोतपरी प्रयत्न करत असल्याचे संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी नमूद केले.दरम्यान, यशस्वी विद्यार्थ्यांनीही आपल्या यशाचे श्रेय कठोर परिश्रम, योग्य नियोजन आणि संस्थेच्या मार्गदर्शनाला दिले असून भविष्यात आयएएस, आयपीएस, आयआरएस तसेच इतर केंद्रीय सेवांमध्ये कार्य करत देशसेवा करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news