Thane News : ठाणे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी मनीष जोशी

Thane News : ठाणे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी मनीष जोशी
Published on
Updated on

ठाणे : ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (१) पदी उपायुक्त मनीष जोशी यांना पदोन्नती देण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या सेवानिवृत्तीनंतर जोशी यांना ही संधी मिळाली आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने आज त्यांच्या पदोन्नतीचे आदेश जारी केले आहेत.

ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) हे पद १ ऑगस्टपासून रिक्त होते. या पदासाठी उपायुक्त मनीष जोशी यांच्या नावाची समितीने शिफारस केली होती. त्यानुसार नगरविकास विभागाने मान्यता देऊन आज जोशी यांना अतिरिक्त आयुक्त म्हणून पदोन्नती देण्याचे आदेश काढले.

जोशी हे ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना महिनाभरासाठी तरी अतिरिक्त आयुक्त होण्याची संधी मिळाल्याबद्दल सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधींनी त्यांचे अभिनंदन करत उशिरा न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली.

दरम्यान, १७ ऑगस्ट रोजी पालिकेचे सचिव या नात्याने त्यांची शेवटची महासभा पार पडली. त्यानंतर ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातर्फे आयोजित छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्यासह सर्व गटनेते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news