7th Pay Commission Thane: ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता; ३० मार्चला खात्यात जमा

परिवहन कर्मचाऱ्यांना तीन हप्ते एकत्र; महापौरांच्या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांत आनंद
सातवा वेतन आयोगा
सातवा वेतन आयोगा(file photo)
Published on
Updated on

ठाणे : ठाणे महापालिका अधिकारी कर्मचारी यांना सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता व परिवहन कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाचे तीन हप्ते देण्याची घोषणा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी आज झालेल्या अर्थसंकल्पीय महासभेत केली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी कर्मचाऱ्यांची देणी देण्याबाबत सूचना केली असल्याचे महापौरांनी यावेळी नमूद केले. येत्या 30 मार्च 2026 रोजी ही रक्कम ठाणे महापालिका आणि परिवहन कर्मचाऱ्यांसह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या निर्णयाने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहेत.

सातवा वेतन आयोगा
Dombivli Vegetable Storage: डोंबिवलीत धक्कादायक प्रकार! स्वच्छतागृहात साठवला जातो भाजीपाला; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

ठाणे महापालिका अधिकारी कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. परिणामी कर्मचाऱ्यांच्या वेतनात 12 ते 15 टक्यांची वाढ झाली. पण त्यांना मागील सहा वर्षांतील वेतन फरकाची रक्कम पाच टप्प्यात देण्यात येणार आहे. त्यातील दोन हफ्ते यापूर्वी अदा करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम अद्याप बाकी असल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यामध्ये नाराजी होती. याबाबत शुक्रवारी झालेल्या अर्थसंकल्पीय महासभेत तिसरा हप्ता कर्मचाऱ्यांसह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देण्याबाबतची घोषणा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी अर्थसंकल्पीय महासभेत बोलतांना दिली. विशेष म्हणजे ठाणे परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रक्कमेचे तीन हफ्ते एकत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत सभागृहनेते हणमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक राम रेपाळे यांनी दिली.

सातवा वेतन आयोगा
Thane Petrol Crisis | ठाणे जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

ठाणे महापालिका अधिकारी कर्मचारी यांची सातव्या वेतन आयोगाची उर्वरित रक्कम देण्याबाबत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सातत्याने आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पाठपुरावा केला होता. महापालिका प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाबाबत महापालिका अधिकारी कर्मचारी, परिवहन सेवेतील अधिकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, आयुक्त सौरभ राव यांचे आभार व्यक्त केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news