Kalyan Robbery Case | ओला उबरच्या चालकांना चाकूचा धाक दाखवत लुटणारा सराईत गुन्हेगार अखेर जेरबंद

कल्याणच्या एमएफसी पोलिसांची कारवाई, संशयिताकडून अनेक गुन्ह्यांची कबुली
 Kalyan Ola Uber Robbery Case
Kalyan Ola Uber Robbery CasePudhari
Published on: 
Updated on: 

Kalyan Ola Uber Robbery Case

डोंबिवली : ओला आणि उबर गाडी बुक करून निर्जनस्थळी चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी बेड्या ठोकून गजाआड केले आहे. साहिल पटेल असे या लुटारूचे नाव असून तो कल्याण पश्चिमेतील जुन्या मच्छी मार्केट परिसरात राहणारा आहे. त्याच्याविरोधात अशाच प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असून मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातही त्याने अनेक कारचालकांना लुटल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी साहिल पटेल याने कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून अंबरनाथला जाण्यासाठी ओला गाडी बुक केली होती. गाडी उल्हासनगर आणि अंबरनाथदरम्यान निर्जन ठिकाणी आल्यानंतर त्याने अचानक चालकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील पैसे लुटून नेले होते. या प्रकरणी चालकाने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

 Kalyan Ola Uber Robbery Case
Kalyan News : कल्याणच्या ग्रामीण भागात वीजचोरांचा सुळसुळाट : ३७ हजारांची चोरी उघडकीस, एमएफसी पोलिसांत गुन्हे नोंद

तक्रारीनंतर महात्मा फुले चौक पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून साहिल पटेल याला अटक केली. चौकशी दरम्यान त्याने अशाच पद्धतीने अनेक ओला उबर चालकांना लुटल्याची कबुली दिली असून त्याच्याविरोधात मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत देखील गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. साहिल पटेलने आणखी किती जणांना अशा प्रकारे लुटले आहे याचा सखोल तपास पोलिस करत असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळीराम परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी विकास मडके अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news