

ठाणे : शरद पवार यांनी १०० वर्ष जगावे अशी प्रार्थना आपण आई जंगदंबेकडे करतो अशी भावना या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केली.
सुंदर मंदिर उभारल्याबद्दल त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांचे आभार मानत या मंदीरांच्या माध्यमातून राजकीय फायदा व्हावा किंवा त्यांना कोणत्या विशिष्ट शब्दाने बोलावे या करता त्यांनी हे केले नसल्याचेही सरनाईक यांनी यावेळी सांगितले.
जितेंद्र आव्हाड यांना मी ३५ वर्षांपासून ओळखतो. सिद्धी विनायक आणि दादर मधील एका मंदीरात आव्हाड सतत जातात. आणि मनात आले तेव्हा ते तुळजापुरला जातात. आव्हाड शिक्षण मंडळात होते तेव्हा तुळजापूर मंदीरातील चिंतामणी दगडावर हात ठेवून अनेक इच्छा मागितल्या होत्या, आणि त्या पुर्ण झाल्या. तुळजापूर मंदीरातून दर्शन करुन येत असताना शरद पवारांच्या कार्यालयातून फोन आला आव्हाडांना विधान परीषदेवर घेतेले आहे .अशा अनेक आठवणी सरनाईक यांनी यावेळी सांगितल्या.
ठाण्यातील हे पहिले मंदीर आहे जे अधिकृत मंदीर आहे. मी सुद्धा इच्छा मागितली होती माझी देखील इच्छा पूर्ण झाली. त्यामुळे मी देखील आता समतानगर येथे मंदीर बनवणार असल्याचे सरनाईक यांनी यावेळी जाहीर केले. मला सर्वोच्च पद मिळाले त्यांच्या काही इच्छा असतील तर ते मागतील मित्र म्हणुन मी पण मागेन. महायुती म्हणुन जे काम आम्ही करतोय त्यांना त्यांचा पाठिंबा कायम असेल अशी आशा सरनाईक यांनी व्यक्त केली.