Kalyan Smart Meter Demo | गैरसमज दूर करण्यासाठी महावितरणने कल्याणच्या पूर्व विभागातील गृहसंकुलात दाखवले स्मार्ट मीटर प्रात्यक्षिक

स्मार्ट मीटर महाविद्युत ॲपद्वारे रिअल टाईम वीज वापर पाहण्याचे प्रात्यक्षिक
Smart Meter Awareness Kalyan Thane
महावितरणच्या कल्याणच्या पूर्व विभागात सुमारे ५०० वीज ग्राहकांना स्मार्ट मीटरचे प्रात्यक्षिक दाखविले. Pudhari
Published on
Updated on

Smart Meter Awareness Kalyan Thane

डोंबिवली :
स्मार्ट मीटर संदर्भात असलेले गैरसमज दूर करून त्याचे महत्त्व वीज ग्राहकांना पटवून देण्यासाठी महावितरणकडून गृहसंकुलात थेट वीज ग्राहकांच्या दारात त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यास सुरूवात केली आहे. महावितरणच्या कल्याणच्या पूर्व विभागात येणाऱ्या कासा गोल्ड आणि कासारिओ या दोन गृहसंकुलांत रविवारी सुट्टीचे औचित्य साधून सुमारे ५०० वीज ग्राहकांना स्मार्ट मीटरचे प्रात्यक्षिक दाखविले.      

कासारिओ गृहसंकुलाचे पदाधिकारी योगेश पाटील, मनिष मामनिया, कासा गोल्डचे पदाधिकारी समिर कोंढाळकर आणि निव्वृती पाटील यांनी या कामी पुढाकार घेतला होता.
    

यावेळी ग्राहकांचे विविध प्रश्न व तक्रारी समजून घेत त्यावर उत्तरे देण्यात आली. स्मार्ट मीटर महाविद्युत ॲपद्वारे रिअल टाईम वीज वापर कसा पहायचा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. उपस्थित ग्राहकांना ॲप इन्स्टॉल करण्याकरिता साह्य केले. विविध वीज उपकरणे व त्यांच्या वीज वापराबाबत माहिती देण्यात आली.

Smart Meter Awareness Kalyan Thane
Kalyan Shil Road Traffic | कल्याण शिळं मार्गावरील वाहतूक कोंडीवर प्रशासनाचा कृती आराखडा

तथापी ग्राहकांनी स्मार्ट मीटर बद्दल ग्राहकाच्या वीज वापराच्या तफावतीच्या बाबतची शंका दूर करण्याकरिता तक्रारीनुसार मीटर चाचणी करण्याची मागणी केली. ग्राहकांच्या मागणीनुसार सिरीज मीटरद्वारे मीटर तपासणी करण्याचे आश्वासन देण्यात आले.


या बैठकीला महावितरणकडून देयके आणि महसूल विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन अंबाडकर, सहाय्यक अभियंता गणेश वग्रे यांच्यासह संचलन व सुव्यवस्था तसेच देयक व महसूल उपविभागातील लिपिक व कर्मचारी उपस्थित होते.

Smart Meter Awareness Kalyan Thane
Kalyan Traffic Jam | वाहतूक कोंडीचा नाट्य कलाकारांना फटका: कल्याणकर रसिक प्रेक्षकांची मागितली माफी

ग्राहकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद

कासा गोल्ड आणि कासा रिओ गृहसंकुलात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला परिसरातील जवळपास ५०० वीज ग्राहक उपस्थित होते. स्मार्ट मीटरचे प्रात्यक्षिक, महाविद्युत ॲपची माहिती आणि वीज वापराची शंका निरसन करण्यासाठी महावितरणचे अधिकारी नितीन अंबाडकर आणि गणेश यांनी उपस्थित ग्राहकांना मार्गदर्शन केले. तर ग्राहकांनी सिरीज मीटरद्वारे मीटर तपासणीची मागणी केली. या मागणीला उपस्थित अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news