Thane Local Train | पुन्हा तेच चित्र! डोंबिवली स्थानकात लोकल रखडली

लटकणाऱ्या प्रवाशांना हटकल्यानंतर लोकल झाली मार्गस्थ
डोंबिवली (ठाणे)
लोकलच्या गर्दीवर नियंत्रण राहिले नसून प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. Pudhari News Network
Published on
Updated on

डोंबिवली (ठाणे) : लोकलच्या गर्दीवर नियंत्रण राहिले नसून प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालल्याचे जिवंत उदाहरण डोंबिवलीत स्थानकात मंगळवारी (दि.10) रोजी सकाळी दिसून आले आहे. सकाळी ८.५९ ची एसी लोकल डोंबिवली स्थानकात दाखल झाली आणि या लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली. दरवाजा बाहेर प्रवासी लटकत असल्याने लोकलचे दरवाजे बंद होत नव्हते.

Summary

एसी लोकल डोंबिवली स्थानकात जवळपास १० मिनिटे रखडली होती. अखेर आरपीएफने पुढाकार घेत काही प्रवाशांना हटकले आणि दरवाजे बंद केल्यानंतर 9.09 मिनिटांनी लोकलचे लोकल मार्गस्थ झाली. लोकलमधील वाढती गर्दी प्रवाश्यांच्या जीवावर बेतली जात असताना रेल्वे प्रशासन मात्र प्रवाशांवरच जबाबदारी ढकलली जात असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

ठाणे
ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या घटनेनंतर लोकलमधील वाढत्या गर्दीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. Pudhari News Network

मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ लोकलमधून पडून चार जणांचा मृत्यू, तर आठ जण जखमी झाल्याची घटना सॊमवारी (दि.9) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली होती. ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या घटनेनंतर लोकलमधील वाढत्या गर्दीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गर्दी कमी करण्यासाठी सामान्य लोकलसह एसी लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी केली जात आहे. रेल्वेकडून प्रवासी संख्या कमी झाल्याचे तर कधी कार्यालयाच्या वेळा बदलून गर्दी कमी करण्याचे सल्ले प्रवाशांना दिले जातात. लोकलच्या गर्दीतून धोकादायक प्रवास टाळण्यासाठी रेल्वे प्रवासी आता एसी लोकलला पसंती देत आहेत. मात्र एसी लोकल दर एक तासाला सोडली जात असल्याने प्रवाशांना साध्या लोकलमधून लटकंती करतच प्रवास करावा लागतो. वाढत्या गर्दीमुळे एसी लोकलचा दरवाजा बंद न होणे, तर कधी दरवाजा उघडत नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून वारंवार केल्या जातात. अनेकदा या लोकल वेळेपेक्षा ५ ते १० मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांच्या गर्दीत भर पडते.

असाच एक कटू अनुभव प्रवाशांना डोंबिवली रेल्वे स्थानकात आला. मंगळवारी सकाळी सकाळी ८ वाजून ५९ मिनिटांनी मुंबईच्या दिशेने जाणारी एसी लोकल फलाटावर दाखल होताच प्रवाशांनी लोकलच्या दरवाजात गर्दी केली. प्रवाशांनी पूर्णपणे भरल्याने काही प्रवासी लोकलच्या दरवाजातच उभे होते. तर प्रवासी दरवाजात राहिल्याने लोकलचे दरवाजे बंद होत नव्हते. हे लक्षात येताच डोंबिवलीच्या फलाट क्रमांक ५ वर असलेले आरपीएफचे जवान 3 नंबर फलाटावर गेले आणि प्रवाश्यांना हटकत बाजूला केले. त्यानंतरच ही लोकल मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news