ठाणे : लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरल्यामुळे विरोधकांना पोटशूळ

लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरल्यामुळे विरोधकांना पोटशूळ
Majhi Ladki Baheen' scheme
लाडकी बहिणी योजनेमुळे अन्य योजना बंद होणार नाहीत,असे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. Pudhari File Photo
Published on
Updated on

धाराशिव : लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरल्यामुळे सावत्र भावांचा पोटशूळ उठल्याचा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. शनिवारी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत परांडा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवरही खरपूस टीका केली. ते म्हणाले, लाडकी बहीण योजना कमालीची लोकप्रिय होऊ लागल्यामुळे विरोधकांच्या पायाखालील वाळू वेगाने घसरत - चालली आहे. त्यामुळेच या योजनेची त्यांनी बदनामी चालवली आहे. सरकार कोणत्याही स्थितीत ही योजना बंद पडू देणार नाही, असा स्पष्ट निर्वाळाही त्यांनी दिला.

कर्नाटकातील प्रकरणावरून टीकास्त्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या लोकांनी कर्नाटकात गणपती उत्सव बंद करण्याचे काम केले. काँग्रेसने कर्नाटकात गणपती बाप्पाला अटक करण्याचे काम केले. गणेशोत्सवात गणपती बाप्पांसोबत त्यांनी हे काम केले. ते हे पाप कुठे फेडणार, असा सवालही त्यांनी केला.

कर्नाटकात नेमके काय घडले?

कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यातील नागमंगला येथे बुधवारी रात्री ८ च्या सुमारास गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांत राडा झाला होता. यामुळे शहरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त तैनात केला. तसेच काही जणांना ताब्यातही घेतले. यावेळी खबरदारी म्हणून पोलिसांनी गणपतीची मूर्ती पोलिस व्हॅनमध्ये ठेवली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या या कृतीवर आता भाजपकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एकनाथ शिंदेंनीही याच घटनेचा दाखला देत काँग्रेसवर हल्लाबोल केला

राहुल गांधींवरही साधला निशाणा

मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांच्या आरक्षण संपवण्याच्या कथित विधानाप्रकरणी संताप व्यक्त केला. राहुल यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, राहुल गांधींनी परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा केली. आता माझ्या बहिणी या काँग्रेसवाल्यांना घरी पाठवण्याचे काम करतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news