Thane KDMC : 27 गावांतील ग्रामपंचायतींंमधील कर्मचार्‍यांचा केडीएमसीत समावेश

ठाण्यात विविध विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
कल्याण डोंबिवली महानगरपालिका
कल्याण डोंबिवली महानगरपालिकाpudhari file photo
Published on
Updated on

ठाणे : ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अखत्यारीतील 27 गावातील ग्रामपंचायती मधील कर्मचार्‍यांचा कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत समाविष्ट करण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत उपस्थित होते. यावेळी सर्व कर्मचार्‍यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार व्यक्त करण्यात आले.

घरात बसून सरकार चालत नाही त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते अशी टीका देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तसेच विधानसभा निवडणूकित धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ यांच्या समोरचेच बटन दाबा असेही त्यांनी सांगितले. तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करा बाकी आमच्यावर सोडा असेही ते म्हणाले. मागील 2 वर्षांत महायुती सरकारने अनेक विकासकामे केली अनेक प्रकल्प आणले, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, लाडका शेतकरी आशा अनेक योजना आणल्या आणि या योजना पुढेही सुरू ठेवायच्या हव्या असतील तर तुम्हाला जागरूक राहवे लागणार असल्याचेही ते म्हणाले. कल्याण डोंबिवलीत 27 गावे समाविष्ट झाली त्याचा जीआर काढला.कर्मचार्‍यांना सामावून घेतले त्याचा जीआर काढला. केडीएमसीत परीवहन कर्मचार्‍यांना जुनी पेंशन लागू केली. हे देणारे सरकार आहे घेणारे सरकार नाही. हे सर्व सामान्यांचे सरकार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

मला खुर्चीचा सत्तेचा मोह नाही. सत्ता सोडून मी विरोधात गेलो. कोणाला सत्तेचा मोह होता आपल्याला माहित आहे. 2019 ला सत्तेचा मोह झाला त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. शिवसेना वाचवण्यासाठी या एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला तो जनतेचा निर्णय होता. मी हा निर्णय घेतला नसता तर 27 गावे गेली समाविष्ट झाली असती का?लाडक्या बहिणींना पैसे मिळाले असते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला. दीड लाखांचा विमा आपण 5 लाख केला. ॠकिती निर्णय घेतले, जीआर काढले हे मला पण माहिती नाही. कार्याकर्ता लोकांच्या दारात शोभून दिसतो

लाडक्या बहिणींना 17 हजार कोटी दिले. भावांना पैसे देणारे हे राज्यातील पहिले सरकार आहे. 1 रुपया पिक विमा, पंपाने शेती करणारे, एसटी ने मोफत प्रवास करणारे, तिर्थाटन योजना करणारे हे पहिले सरकार आहे. योजना चालू राहिल्या पाहिजे ना, तुम्हाला पगार मिळाला पाहिजे ना मग काय केले पाहिजे या प्रश्नावर सभागृहातून एकच वेळी नागरिकांनी मुख्यमंत्री तुम्हीच झाले पाहिजे अशा घोषणा दिल्या.

या कार्यक्रमानंतर शिंदे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उपवन घाट, उपवन तलाव, मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक कॅशलेस हॉस्पिटल नळ पाडा, कासारवडवली तलाव, श्रीराम मंदिराजवळ, घोडबंदर रोड, मोघर पाडा तलाव तसेच धर्मवीर आनंद दिघे वाचनालय आणि अभ्यासिकाकशिश पार्क, मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे ज्येष्ठांचे नंदनवन, हाजुरी, मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालयाच्या इमारतीचा विस्तार आदी कामाचे लोकपर्ण आणि भूमीपजून केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news