ठाणे : पैसे उकळणारा केडीएमसीचा अभियंता निलंबित

सार्वजनिक बांधकामांच्या गुणवत्तेवर संशय
केडीएमसी मुख्यालय
केडीएमसी मुख्यालयात ठेकेदाराकडून नोटांचे बंडल स्वीकारताना कनिष्ठ अभियंता संजय सोमवंशी स्पष्ट दिसत आहेत.pudhari news network
Published on
Updated on

डोंबिवली : कामाच्या बदल्यात ठेकेदाराकडून पैसे उकळणारा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या दक्षता आणि गुणनियंत्रण विभागाचे प्रभारी कनिष्ठ अभियता तथा प्रयोगशाळा सहाय्यक संजय सोमवंशी यांना आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी सोमवारी (दि.9) रात्री तडकाफडकी निलंबित केले. सेवानिवृत्तीला अवघे चार महिने शिल्लक असताना अभियंता सोमवंशी लाचखोरीच्या सापळ्यात अडकले.

कनिष्ठ अभियता तथा प्रयोगशाळा सहाय्यक संजय सोमवंशी यांच्या लाचखोरीमुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील गेल्या 25 वर्षांत लाचखोर अधिकारी आणि कर्मचार्‍यांची संख्या आता 44 झाली आहे. संजय सोमवंशी हे नोटांचे बंडल घेतल्यानंतर नोटा मोजून शर्टच्या खिशात कोंबताना स्पष्ट दिसत आहे. या व्हिडियोमध्ये अभियंता सोमवंशी हे नोटांचे पुडके देणार्‍या ठेकेदाराला सुनावताना देखिल ऐकायला मिळते. तो घ्यायला येतो एक आणि देतो एक...नमस्कार करतो आणि निघून जातो...असे बोलत असल्याचे दिसते. गटार आणि काँक्रिट रस्त्याच्या गुणवत्ता तपासणीच्या कामासाठी सोमवंशी यांनी हे पैसे स्वीकारली असल्याचे ठेकेदारांकडून सांगण्यात आले. संजय सोमवंशी यांच्याशी संपर्क साधला, तो होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.

काय आहेत आयुक्तांचे आदेश?

संजय सोमवंशी यांनी केलेल्या गैरवर्तनामुळे महापालिकेची जनमानसातील प्रतिमा मलिन झाली आहे. सोमवंशी यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 मधील नियम 3 चे उल्लंघन केल्याने शिस्तभंग विषयक कारवाई म्हणून त्यांना खातेनिहाय चौकशीच्या अधिन राहून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 मधील नियम 4 मधील तरतुदीनुसार पालिका सेवेतून निलंबित करण्यात येत आहे. निलंबन काळात खासगी नोकरी किंवा धंदा करणे अनुज्ञेय नाही. वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. नियमाप्रमाणे निलंबन काळात निर्वाह भत्ता अनुज्ञेय राहिल. आदेशाची नोंद सेवापुस्तकात घेण्याच्या सूचना आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी आदेशातून दिल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news