

कसारा ः मुंबई नाशिक महामार्गवरील कसारा वाशाळा चौफुलीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबधीत कंपनीने केलेल्या निकृष्ठ व अपघातास आमंत्रण ठरणार्या चौफुलीवरील कामाविरोधात शिवसेना शाखा कसाराच्या वतीने आंदोलनाचा इशारा दिला होता.अखेर याची दखल घेत रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे.
भारतीय राजमार्ग राष्ट्रीय प्राधिकरण प्रशासन व ठेकेदार कंपनीने आंदोलनाच्या इशार्याचा धसका घेत नरमाईची भूमिका घेऊन 16 जून 2025 रोजी वाशाळा-कसारा धोकादायक रस्ता सुस्थितीत करण्याच्या कामाला सुरुवात केली.
याबाबत महामार्ग प्रशासनाने ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांशी पत्रव्यवहार करीत आपल्या मागणीनुसार व म्हणण्याप्रमाणे काम करण्यात येईल.अशी ग्वाही दिल्याने शिवसेना ठाकरे गटाने काम पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेतले आहे. याप्रकरणी खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी देखील शिवसेनेच्या आंदोलनाच्या ईशार्या ची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सिगल इन्फ्रा ठेकेदार कंपनी च्या अधिकार्यांना फैलावर घेत चौफुली वरील त्रुटी सुधारण्यासाठी आदेश दिले होते.
दरम्यान कसारा सह अन्य ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग च्या सिगल इन्फ्रा या ठेकेदारा ने अनेक ठिकाणी निकृष्ठ दर्जाजी कामे करून वाहतूकदार वाहन चालक यांच्या जीवाशी खेळ सुरु केला आहे.अनेक निवेदन देऊन देखील त्याची दखल घेतली जातं नव्हती. आंदोलनाचा इशारा देताच प्रशासनाने कामाला सुरुवात केली जर संबंधित ठेकेदार कंपनीने निकृष्ठ दर्जाचे काम केल्यास जिल्हात रस्तारोको करू.
कुंदन पाटील, जिल्हाप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)