

नेवाळी : शुभम साळुंके
कल्याण ग्रामीण विधानसभेवर शिवसेनेने भगवा फडकवला. त्यानंतर निवडून आलेले आमदार राजेश मोरे मतदारसंघात नागरिकांच्या अडचणी समजून घेत आहेत. त्यांच्या या कामाबद्दल कल्याण लोकसभेचे खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कौतुक केलंय. मात्र ते आज उडी मारत असताना पडले आणि त्यांचा हाच फ्रॅक्चर झाला हेही सांगितले, आणि त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कल्याण लोकसभेचे खा.डॉ. श्रीकांत शिंदे अंबरनाथ मध्ये सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी गेले होते. यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे आणि अंबरनाथ मधील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पाहणी दरम्यान नाला ओलांडण्यासाठी आमदार मोरे यांनी उडी मारली आणि समोर एक खड्डा होता त्यात ते घसरून हातावर पडले, तो खड्डा त्यांना दिला नसावा त्यामुळे हा अपघात झाला, अशी चर्चा रंगली आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात आमदार राजेश मोरे यांची स्तुती करत सांगितले की लोकांना वाटलं होतं की राजेश मोरे निवडून येतील की नाही मला माहित होतं की राजेश मोरे यांच्यासारखा सामान्य कार्यकर्ता आपण दिला सर्व कार्यकर्ते त्यांच्या करता जोरात धावू लागले आणि आज एक सामान्य कार्यकर्ता आमदार झाला ते राजेश मोरे आज लांब उडी घेता घेता खाली पडले त्यांचा हा फ्रॅक्चर झाला ते ऍडमिट आहेत म्हणून येऊ शकले नाहीत निवडून आल्यापासून २४ तास सकाळी सात वाजल्यापासून आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध असलेले आमदार आपल्याला मिळालेले आहेत, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे.