

डोंबिवली : कल्याणच्या संतोष स्पोर्टस क्रिकेट अकादमीचा संघ सलग नवव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा व उच्च प्रशिक्षणासाठी जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) या दौऱ्यावर जात आहे. 19 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत संतोष स्पोर्टस क्रिकेट अकादमीचा संघ जोहान्सबर्ग येथे काही सामने खेळणार आहे. तसेच उच्च दर्जाचे प्रशिक्षण देखील घेणार आहे, अशी माहिती अकादमीचे मुख्य प्रशिक्षक संतोष पाठक यांनी दिली.
या संघात अविजित नायर, साई पाटील, सलील साटम, भार्गव बँकर, सोहम गवारी, पार्थ दोषी, ग्रंथ मल्होत्रा, घनामृत पाटील, शौर्य तिवारी, कृष्णा धामी, निकुंज खत्री, सर्वेश पाटील, आर्यन खानचंदानी, प्रथम सिंग, कुशल गोपी, यश भुरभुडा यांचा समावेश आहे.
या संघामध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून खेळाडू निवडले आहेत. या दौरामध्ये संतोष स्पोर्टस क्रिकेट अकादमीतर्फे निवडलेला महाराष्ट्राचा संघ 2 डे - नाईट आणि 6 टी - 20 डे सामने खेळणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू मॉर्केल बंधू व लायन्स टीमचे प्रमुख प्रशिक्षक कर्ट हुमन आणि क्रिकेटर शौकत पंडोर यांच्याकडून या संघातील खेळाडू उच्च दर्जाचे प्रशिक्षण घेणार आहेत.
या स्पर्धेचे आयोजन साऊथ आफ्रिकेतील ईस्टर्न क्रिकेट अकॅडमीने केले आहे. भारतीय युवा खेळाडूंना क्रिकेट प्रशिक्षण व सामने यामधून नक्कीच फायदा होईल, असे या दौऱ्याचे प्रमुख आयोजक संतोष पाठक यांनी सांगितले. या संघाचे प्रमुख म्हणून संतोष पाठक हे स्वतः असणार आहेत. तसेच प्रशिक्षक म्हणून परेश हिंदुराव है काम पाहणार आहेत. या सर्व टीमला आमदार संजय दत्त आणि ब्रिजकिशोर दत्त यांनी खेळाडूंशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या.