कल्याण-कसारा रेल्वे वाहतूक ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

Thane News | टिटवाळ्याजवळ गीतांजली एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड
Kalyan Kasara railway disruption
गीतांजली एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बुधवारी सकाळी टिटवाळा रेल्वे स्थानकानजीक बिघाड झाला. File Photo
Published on
Updated on

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : मुंबईहून कोलकात्याकडे निघालेल्या गीतांजली एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बुधवारी (दि. ११) सकाळी टिटवाळा रेल्वे स्थानकानजीक बिघाड झाला. परिणामी ही एक्स्प्रेस जागीच खोळंबून राहिल्याने या एक्स्प्रेसच्या मागे कसारा दिशेला जाणाऱ्या लोकल्ससह लांब पल्ल्याच्या गाड्या आंबिवली, शहाड ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात खोळंबून राहिल्या होत्या. कसाऱ्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक जवळपास एक तास ठप्प झाली होती.

एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात येताच गीतांजलीच्या लोको पायलटसह टिटवाळा रेल्वे स्थानकातील तंत्रज्ञांनी एकत्रितपणे इंजिनमधील बिघाड दुरूस्त करण्याचे काम हाती घेतले. तरीही इंजिनमधील बिघाड दुरूस्त होत नसल्याने अखेर कल्याणच्या कारशेडमधून नवीन इंजिन आणून ते गीतांजली एक्स्प्रेसला जोडण्याचा निर्णय रेल्वे अधिकाऱ्यांनी घेतला. हे इंजिन जोडून एक्स्प्रेस पुढच्या मार्गाकडे रवाना होईपर्यंत मुंबई ठाणे, डोंबिवली, कल्याण परिसरातून शहापूर, आटगाव, कसारा, आदी भागात नोकरी व्यवसायानिमित्त जाणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले.

बराच उशीर लोकल एकाच जागी खोळंबून राहिल्याने प्रवासी संतप्त झाले होते. कल्याणमधून भाजीपाला घेऊन जाणारे किरकोळ विक्रेतेही लोकलमध्ये अडकून पडले होते. दरम्यान, यावेळी मुंबईकडे जाणारी लोकल सेवा मात्र सुरळीत होती. परिणामी मुंबईहून कसाऱ्याकडे जाणारी एक लोकल कल्याण रेल्वे स्थानकात या कालावधीत रद्द करण्यात आली. ही लोकल कल्याण स्थानकातूनच पुन्हा मुंबईला रवाना करण्यात आली.

Kalyan Kasara railway disruption
ठाणे : उल्हासनगरात बिस्कीट कंपनीला आग

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news