Heavy Vehicle Ban
ठाणे, कल्याण ते बदलापूरपर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदीfile photo

Heavy vehicle ban : ठाणे, कल्याण ते बदलापूरपर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी

वाहतूककोंडीवर उपाययोजना
Published on

ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवजड वाहनांना (10 चाकी किंवा त्यापेक्षा जास्त) घोडबंदर भागात दिवसा प्रवेशबंदीचे आदेश दिल्यानंतर मंगळवारी रात्री ठाणे वाहतुक पोलिसांनी त्यासंदर्भाची अधिसूनचा काढली आहे. ठाणे ते बदलापूरपर्यंत अवजड वाहनांना दिवसा प्रवेशबंदी लागू करण्यात आली असून हे वाहतुक बदल गुरुवारी, 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत दररोज सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत लागू असतील. त्यामुळे अवजड वाहने मध्यरात्री वाहतुक करू शकतील.

ही अधिसूचना प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आली आहे. हरकती आणि सूचना असल्यास लेखी स्वरुपात तीन हात नाका येथील ठाणे वाहतुक शाखेच्या उपायुक्त कार्यालयात पाठविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. मुंबई, नवी मुंबई येथून आनंदनगर चेकनाका मार्गे ठाणे शहरात प्रवेश करणार्‍या सर्व अवजड वाहनांना आनंदनगर चेकानाका जवळ प्रवेशबंदी असेल.

गुजरात येथून घोडबंदर मार्गे वाहतुक करणार्‍या अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेशबंदी असेल. मुंबई, विरार, वसई येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणार्‍या वाहनांना फाऊंटन हॉटेलजवळ प्रवेशबंदी असेल. बेलापूर-ठाणे मार्गे विटावा जकात नाका मार्गे कळवा येथे वाहतुक करणार्‍या वाहनांना नवी मुंबईतील पटणी चौकात प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.

पनवेल ठाणे मार्गावरून रेतीबंदर पुढे पारसिक चौक येथे डावे वळण घेऊन कळव्याच्या दिशेने वाहतुक करणार्‍या अवजड वाहनांना पारसिक चौकाजवळ प्रवेशबंदी आहे. तळोजा एमआयडीसी येथून तळोजा बाह्यवळण, उसटणे, खोणी, नेवाळी नाका मार्गे वाहतुक करणार्‍या अवजड वाहनांना तळोजा एमआयडीसी येथे तसेच कर्जत येथून बदलापूरच्या दिशेने वाहतुक करणार्‍या अवजड वानांना अंबरनाथ येथील खरवई नाका येथे प्रवेशबंदी असेल. मुरबाड येथून बदलापूर, अंबरनाथच्या दिशेने ऐरंजाड येथे प्रवेशबंदी असेल.

Heavy Vehicle Ban
Thane lake pollution : सर्वपित्री अमावस्येच्या विधी, छट पूजेमुळे ठाण्यातील तलाव प्रदूषित

शिळफाटा येथे प्रवेशबंद

महापे नवी मुंबई मार्गे शिळफाटा येथून वाहतुक करणार्‍या वाहनांना शिळफाटा येथे प्रवेशबंदी असेल. वाडा मार्गे नदीनाका भिवंडी शहराच्या दिशेने वाहतुक करणार्‍या अवजड वाहनांना पारोळ फाटा येथे तर वाडा चेकपोस्ट मार्गे धामणगाव, जांबोळी जलवाहिनी नाका आणि चाविंद्रा नाका येथे प्रवेशबंदी केली जाईल.

नाशिक महामार्गावर अशी प्रवेश बंदी

रांजनोली चौकातून भिवंडी शहरात वाहतुक करणार्‍या अवजड वाहनांना सरवली गाव येथे प्रवेशबंदी असेल. नाशिक महामार्गाने बदलापूर, नवी मुंबई, पुणे, उरण न्हावाशेवा येथे जाण्यासाठी बापगाव, गंधारी मार्गे वाहतुक करणार्‍या अवजड वाहनांना पडघा येथील तळवली चौकात प्रवेशबंदी असेल. शहाड पूल मार्गे कल्याणच्या दिशेने म्हारळ येथे प्रवेशबंदी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news