Thane accident: कळव्यात हिट अँड रनची घटना; महिलेचा मृत्यू, तर दोघे गंभीर

Kalwa hit and run accident: घटनेनंतर वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला असल्याची प्राथमिक माहिती आहे
Thane accident: कळव्यात  हिट अँड रनची घटना; महिलेचा मृत्यू, तर दोघे गंभीर
Published on
Updated on

ठाणे : कळवा येथील खारीगाव परिसरातील एका सोसायटीच्या आवारात चारचाकी वाहनाने अनेकांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

Thane accident: कळव्यात  हिट अँड रनची घटना; महिलेचा मृत्यू, तर दोघे गंभीर
Thane Accident : भररस्त्यात ३० मीटर उंचीवरून लोखंडी अँगल कोसळला

मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुण चारचाकी वाहन चालवत होता. सोसायटीच्या आवारातून हायवेकडे जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने परिसरातील नागरिकांना धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. धडकेमध्ये एक महिला गंभीर जखमी झाली. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अन्य दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Thane accident: कळव्यात  हिट अँड रनची घटना; महिलेचा मृत्यू, तर दोघे गंभीर
Thane road accident : खारेगाव उड्डाणपुलावर दोन वाहनांची धडक

घटनेनंतर वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला असल्याची प्राथमिक माहिती आहे.अपघाताची माहिती मिळताच कळवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, अपघात नेमका कशामुळे झाला, वाहनाचा वेग किती होता आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण कसे सुटले, याचा तपास सुरू आहे.या घटनेमुळे खारीगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सोसायटीच्या आवारात वाहनांची सुरक्षितता आणि वेगावर नियंत्रण ठेवण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news