Crime News: भिवंडीतील हॉटेलवर छापा दलाल महिलेला अटक

पोलिसांनी या ठिकाणावरून दोन महिलांची सुटका केली असून तिच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल फोनही जप्त केले आहेत.
Jail
JailPudhari
Published on
Updated on

भिवंडी: तालुक्यातील काल्हेर भागात असलेल्या एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसाय रॅकेटवर कारवाई करीत ठाणे शहर पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी पथकाने छापा टाकला आणि एका महिला दलालास अटक केली आहे. पोलिसांनी या ठिकाणावरून दोन महिलांची सुटका केली असून तिच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल फोनही जप्त केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई 12 मे 2026 रोजी सायंकाळी साधारण 4:35 वाजता ठाणे-भिवंडी रस्त्यावरील काल्हेर गावाच्या हद्दीत हॉटेल वंश किचन फॅमिली रेस्टॉरंट अँड बारच्या आवारात करण्यात आली. अटक करण्यात आलेली महिला दलाल, पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायात ढकलण्यासाठी भाग पाडत होती, असा आरोप आहे.

Jail
Central Railway Revenue: मुंबई विभागाने मिळविला 570 कोटींचा महसूल; मध्य रेल्वेची एप्रिल 2026 मध्ये दमदार कामगिरी

तपासा दरम्यान असे निष्पन्न झाले की, आरोपी महिलेने या महिलांच्या अत्यंत हलाखीच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचा गैरफायदा घेत ग्राहकांसोबत लैंगिक कृत्य करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला आणि या बेकायदेशीर धंद्यातून मिळणाऱ्या कमाईवर ती आपला उदरनिर्वाह करत होती.

या छाप्यात पोलिसांनी 4,470 रुपये रोख रक्कम आणि एक सॅमसंग मोबाईल फोन जप्त केला. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विजय रामलाल पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news