विक्रमगड : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेशाची प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालना यातर्फे आयटीआय अभ्यासक रमासाठी मंगळवारी प्रवेशाचे पुरवणी वेळापत्रक जाहीर केले. वेळापत्रकाप्रमाणे 04 ते 17 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी, अर्ज निश्चितीची प्रक्रिया करता येणार आहे.
मंगळवारी (दि,3) पुरवणी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले. संचालना यातर्फे आयटीआय अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया जूनमध्ये सुरू झाली होती. प्रवेश प्रक्रियेच्या चार फेरी पूर्ण झाल्या. यानंतर संस्थास्तरावर एक समुपदेशन फेरी पार पडली. ही प्रवेश फेरी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झाली. यानंतरही जागा रिक्त आहेत. मिळालेली मुदतीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रक्रियेमुळे प्रवेशाची संधी मिळाली आहे. संस्थास्तरावर होणार्या समुपदेशन फेरीचे वेळापत्रक संचालनालयाने संकेस्थळावर उपलब्ध करुन दिले आहे. एकत्रित गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर संस्थास्तरावर हजेरी, गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना बोलाविण्यात येणार आहे.
ऑनलाईन नोंदणी, अर्ज निश्चिती - 4 ते 17 सप्टेंबर
रिक्त जागांची यादी जाहीर - 17 सप्टेंबर
एकत्रित गुणवत्ता यादी जाहीर 18 सप्टेंबर
संस्थेत फेरीसाठी हजेरी नोंदवणे - 19 ते 30 सप्टेंबर
संस्थास्तरावर गुणवत्ता यादी - 19 ते 30 सप्टेंबर
प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही - 19 ते 30 सप्टेंबर