बोईसर : पालघर तालुक्यातील विशेष म्हणजे शहरांतील बहुतांश नागरिक आरोग्यासाठी आरओ प्लांटचे पाणी पिण्यासाठी वापरत आहेत. नियमानुसार दर ६ महिन्यांनी पाण्याची शुद्धता तपासणे आवश्यक आहे. हे काम राष्ट्रीय भूजल सर्वेक्षण आणि अन्न व औषध विभागाचे आहे. मात्र, बोईसर पुर्व भागांत तपासणी होत नसून गावपाड्यात प्लांट उभारण्यात आले आहेत. त्या पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.
तालुक्यात आरो प्लांट च्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतके रजिस्टर प्लांट आहेत मात्र बोईसर शहरासह पुर्व ग्रामीण भागांत जार आणि बाटल्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचवले जात आहे. त्यामुळे महिन्याला लाखांहून अधिकचा व्यवसाय होत आहे. याठिकाणी लहान मुले आणि वृद्धांसह सर्वजण चांगले आरोग्य राखण्यासाठी या पाण्याचे सेवन करत आहेत. मात्र, हे पाणी शरिरासाठी किती शुद्ध आणि फायदेशीर आहे, याचा शोध घेतला जात नाही. पाणी तपासणीच्या प्रश्नाकडे संबंधित विभाग सातत्याने दुर्लक्ष करत असून आरओ प्लांट मालकही पाण्याच्या शुद्धतेकडे गांभीयनि पाहत नाहीत. काही नागरिक थंड पाणी पाहूनच डबा खरेदी करतात, मात्र, आरोग्याबाबत गंभीर नसल्याची परिस्थितीत दिसून येत आहे.
शहर आणि ग्रामीण भागात २० ते ३० रुपयांच्या दराने प्रती कॅन पाणी विकले जात आहे. एका कॅनमध्ये १८ लिटर पाणी शुद्ध पाण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय वाढत आहे, अशा परिस्थितीत आता आरो प्लांटचे पाणी प्रत्येक घरात वापरले जाऊ लागले आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, परंतु संबंधित अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत ही दुर्दैवाची बाब आहे.